iPhone आणि iPad ची निर्मिती होणार बंद! 10 वर्षात पहिल्यांदाच Apple नं घेतला असा निर्णय
By सिद्धेश जाधव | Updated: December 9, 2021 17:02 IST2021-12-09T17:00:58+5:302021-12-09T17:02:06+5:30
Apple वर iPhone आणि iPad ची निर्मिती रोखण्याची वेळी आली आहे. कंपनीनं यावर्षीचे विक्रीचे टार्गेट्स देखील मोठ्याप्रमाणावर कमी केले आहेत.

iPhone आणि iPad ची निर्मिती होणार बंद! 10 वर्षात पहिल्यांदाच Apple नं घेतला असा निर्णय
कोरोना महामारीमुळे जगभरातील सप्लाय चेन विस्कळीत झाली आहे. याचा प्रभाव सर्वच कंपन्यांवर पडला आहे. अनेक डिव्हाइसेसचे लाँच पुढे ढकलण्यात आले, काही रद्द करण्यात आले. टेक दिग्गज Apple ला देखील यातून वाचता आलं नाही. आतापर्यंत अॅप्पलच्या पुरवठा साखळी आणि मागणीवर कधीही परिणाम झालाय नाही, परंतु यावर्षी चित्र बदललं आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये ख्रिसमसचे दिवस येत आहेत. त्यामुळे कंपनीनं डिव्हाइसेसची निर्मिती वाढवली पाहिजे होती.
Nikkei Asia च्या रिपोर्टनुसार, अॅप्पलनं ख्रिसमसच्या आधी iPhone 13 ची निर्मिती कमी केली आहे. यावर्षी 1 कोटी युनिट्स कमी निर्माण केले जातील. तसेच यावर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये देखील टार्गेट पेक्षा 20 टक्के कमी आयफोन 13 निर्माण करण्यात आले आहेत. रिपोर्ट्सनुसार कंपनी आयफोन आणि आयपॅडचे प्रोडक्शन पुढील काही दिवस बंद करू शकते. यामागे चिप शॉर्टेज आणि चीनी ग्लोडेन हॉलीडे ही दोन कारणं सांगण्यात आली आहेत.
याआधी अॅप्पल सप्टेंबर ते डिसेंबर या काळात ओव्हरटाईम देऊन काम करुवून घेत होती. गेल्यावर्षी कोरोना काळात देखील चीनी ग्लोडेन हॉलीडे सोडून निर्मिती करण्यासाठी कंपनीनं प्रोत्सहन दिलं होतं. परंतु यावर्षी अॅप्पल सप्लायर्सना सुट्टी देत आहे. निर्मितीसाठी संसाधनं कमी असल्यामुळे कंपनीनं प्रोडक्शन काही दिवस बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं, सांगण्यात आलं आहे. आशा आहे कि यातून कंपनी लवकरच काही तरी मार्ग काढेल.