'अॅपल' कंपनीत संधी, युएईमध्ये मिळणार नोकरी; जाणून घ्या सारंकाही...

By मोरेश्वर येरम | Published: December 20, 2020 03:26 PM2020-12-20T15:26:07+5:302020-12-20T15:27:27+5:30

आयफोन, मॅकबूक आणि आयपॅड तयार करणाऱ्या या कंपनीकडून स्टोअर मॅनेजर, तंत्रज्ञ, क्रिएटीव्ह इंडिव्हीज्युल्स आणि बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजरपदासाठी कुशल कर्मचाऱ्यांचा शोध सुरू आहे.

apple is hiring in UAE here are the vacancies | 'अॅपल' कंपनीत संधी, युएईमध्ये मिळणार नोकरी; जाणून घ्या सारंकाही...

'अॅपल' कंपनीत संधी, युएईमध्ये मिळणार नोकरी; जाणून घ्या सारंकाही...

Next
ठळक मुद्देअॅपल कंपनीत नोकरीची संधी, पण काम करावं लागेल 'यूएइ'मध्येविविध जागांसाठी अॅपल स्टोअरमध्ये निघाली भरतीअॅपल कंपनीच्या संकेतस्थळावर नोकरीबाबतची जाहीरात

यूएई
अमेरिकेची सुप्रसिद्ध अॅपल कंपनीमध्ये लवकरच मोठी भरती निघणार आहे. संयुक्त अरब अमिरातमध्ये (यूएई) कंपनीकडून विविध पदांसाठी जागा भरल्या जाणार आहेत. 

आयफोन, मॅकबूक आणि आयपॅड तयार करणाऱ्या या कंपनीकडून स्टोअर मॅनेजर, तंत्रज्ञ, क्रिएटीव्ह इंडिव्हीज्युल्स आणि बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजरपदासाठी कुशल कर्मचाऱ्यांचा शोध सुरू आहे. सध्या यूएईमध्ये तीन ठिकाणी अॅपल कंपनीचे स्टोअर आहेत. यात इमराती येथील मॉल, दी दुबई मॉल आणि अबुधाबी येथील यस मॉलमध्ये अॅपलचे स्टोअर्स आहेत. 

फोर्ब्स मासिक आणि एका बाजार संशोधन संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात सर्वाधिक रोजगार निर्मिती करणाऱ्या कंपन्यांमध्ये अॅपल कंपनीचा जगात सहावा क्रमांक लागतो. मग तुमचीही 'यूएई'मध्ये जाऊन नोकरी करायची तयारी असेल तर 'अॅपल'ची ही जाहीरात नक्कीच वाचा.

'अॅपल'मध्ये आहे पुढील पदांसाठी भरती...
>> स्पेशलिस्ट:  ग्राहकांना उत्तम मार्गदर्शन करुन योग्य ते प्रोडक्ट त्यांच्या हाती सोपविण्याची हातोटी असणाऱ्या व्यक्तीला प्राधान्य. उमेदवाराला तांत्रिक गोष्टी आणि तंत्रज्ञानामध्ये आवड असायला हवी. अॅपल कंपनी ग्राहकांना देत असलेल्या सर्व फिचर्सची उत्तम माहिती असणं आवश्यक. संभाषण कौशल्य उत्तम हवं. 

>> स्टोअर लीडर: टीमचं नेतृत्त्व करण्याचं कसब आणि विविध विभागांमध्ये समन्वयाची भूमिका निभावता येणं गरजेचं आहे. ग्राहकांना अॅपलचे फिचर्स समजावून सांगणाऱ्या टीमचं नेतृत्त्व स्टोअर लीडरला करावं लागेल. त्यासाठी अॅपलच्या प्रत्येक प्रोडक्टची उत्तम माहिती असणं आवश्यक आहे. 

>> जिनिअस: अॅपलच्या तांत्रिक घडामोडींवर चाणाक्षपणे लक्ष ठेवणाऱ्या व्यक्तीला प्राधान्य. प्रोडक्टमध्ये कोणतीही कमतरता आणि तांत्रिक अडचण असेल तर ती सोडविण्यासाठी लागणारं हार्डवेअरचं ज्ञान असणं आवश्यक आहे. 

>> ऑपरेशन एक्स्पर्ट: बाजारात बदलत्या मागण्या आणि ट्रेंड लक्षात घेऊन टीमला मार्गदर्शन करणं. प्रसंगावधान बाळगून कोणत्याही समस्येवर तात्काळ तोडगा काढण्याची क्षमता. संबंधित व्यक्तीवर स्टोअरमधील प्रोडक्ट्स, पार्ट्स, टूल्स, पुरवठा आणि इतर सर्व बाबींची जबाबदारी असेल. 
>> मॅनेजर, सीनिअर मॅनेजर, मार्केट लीडर आणि तंत्रज्ञ अशा विविध जबाबदाऱ्यांसाठी नोकरीची संधी आहे.
 

Web Title: apple is hiring in UAE here are the vacancies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.