Apple ने भारतात बंद केली लोकप्रिय iPhone ची विक्री, हे आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 02:32 PM2019-07-16T14:32:04+5:302019-07-16T14:37:17+5:30

भारतात अ‍ॅपलने आपल्या चार आयफोनची विक्री बंद केली आहे. कंपनीने स्वस्तात विकल्या जाणाऱ्या iPhone SE, iphone 6s, iphone 6Plus आणि iphone 6sPlus या चार आयफोन्सची भारतातील विक्री बंद केली आहे.

apple ihone se iphone 6 iphone 6s and iphone 6s plus sales stopped in india | Apple ने भारतात बंद केली लोकप्रिय iPhone ची विक्री, हे आहे कारण

Apple ने भारतात बंद केली लोकप्रिय iPhone ची विक्री, हे आहे कारण

Next
ठळक मुद्देभारतात अ‍ॅपलने आपल्या चार आयफोनची विक्री बंद केली आहे. iPhone SE, iphone 6s, iphone 6Plus आणि iphone 6sPlus या चार आयफोन्सची भारतातील विक्री बंद केली आहे. कंपनीने आपल्या नव्या धोरणानुसार, विक्रीच्या संख्येपेक्षा किंमतींवर लक्ष्य केंद्रीत करण्याचे ठरवले आहे. 

नवी दिल्ली - भारतात अ‍ॅपलने आपल्या चार आयफोनची विक्री बंद केली आहे. कंपनीने स्वस्तात विकल्या जाणाऱ्या iPhone SE, iphone 6s, iphone 6Plus आणि iphone 6sPlus या चार आयफोन्सची भारतातील विक्री बंद केली आहे. कंपनीने आपल्या नव्या धोरणानुसार, विक्रीच्या संख्येपेक्षा किंमतींवर लक्ष्य केंद्रीत करण्याचे ठरवले आहे. 

कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतातील बाजारपेठेत या चारही आयफोनचा पुरवठा गेल्या महिन्यापासून थांबवण्यात आला आहे. हे चारही फोन अ‍ॅमझॉन आणि फ्लिपकार्टवरून आऊट ऑफ स्टॉक झाले आहेत. अ‍ॅपल कंपनीच्या डिस्ट्रीब्युटर्सच्या सेल्स टीमला याची माहिती देण्यात आली आहे. भारतात या चार फोनची विक्री थांबवण्यात आली असली तरी अमेरिकेत मात्र अ‍ॅपलच्या वेबसाईटवर हे चारही फोन विक्रीसाठी उपलब्ध आहेत. 

अ‍ॅपलने 2018-19  मध्ये भारतातील रेवेन्यू आणि प्रॉफिटमध्ये वाढ झाल्याने हा निर्णय घेतला आहे. गेल्यावर्षी आयफोनच्या विक्रीत घट झाली होती. मात्र कंपनीने महागड्या आयफोन्सवर फोकस केले. एप्रिल-जूनमध्ये आयफोन एक्सआरची किंमत कमी झाल्याने अ‍ॅपलच्या विक्रीत वाढ झाली होती. 2018 मध्ये अ‍ॅपलच्या रेवेन्यूमध्ये 12 टक्क्यांची वाढ झाली आहे. तसेच कंपनीचं नेट प्रॉफिट दुप्पट झालं आहे.

अ‍ॅपल (Apple) कंपनी यंदाच्या वर्षात तीन नवीन iPhone लाँच करणार आहे. यामधील एका आयफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा असणार आहे. तर, एक आयफोन लो-कॉस्ट एलसीडी मॉडेल असलेला असले. याबाबतची माहिती वॉल स्ट्रीट जर्नलने दिली आहे. 

वॉल स्ट्रीट जर्नलच्या माहितीनुसार, आयफोन एक्सआर (iPhone XR) ची म्हणावी तशी मार्केटमध्ये विक्री झाली नाही. त्यामुळे अ‍ॅपल कंपनी LCD iPhone आणि दोन नवीन प्रीमियम मॉडेल मार्केटमध्ये घेऊन येणार आहे. हे दोन नवीन प्रीमियम मॉडेल iPhone XS च्या पुढील रेंजमधील असणार आहेत. 

नवीन आयफोनमध्ये असणार ट्रिपल कॅमेरा सेटअप

मोबाईल मार्केटमध्ये आपल्या प्रतिस्पर्ध्यांना कडवी टक्कर देण्यासाठी अ‍ॅपल कंपनीने प्रीमियम मॉडेलमध्ये पहिला ट्रिपल कॅमेरा सेटअप करण्याचे काम करत आहे. iPhone XR  आणि  iPhone XS च्या सक्सेसरमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा असणार आहे. या नवीन आयफोनच्या मागीच्या बाजूला दोन कॅमेरे असणार आहेत. याशिवाय, नवीन एलसीडी आयफोनला अपडेट करण्यात येणार आहे. 

 2020 मध्ये एलसीडी आयफोन येणार नाही

रिपोर्टनुसार, अ‍ॅपल कंपनी 2020 मध्ये आपल्या आयफोनमधून एलसीडी ऑप्शन ड्रॉप करणार आहे. कंपनी 2020 मध्ये फक्त OLED-Only आयफोन बाजारात आणणार आहे. कारण, OLED टेक्नॉलॉजी चांगल्याप्रकारे काँट्रास्ट आणि कलर रिप्रॉडक्शन ऑफर करते. तर, दुसऱ्या एका लीक रिपोर्टच्या माहितीनुसार, अ‍ॅपल कंपनी आपल्या कॅमेरा सिस्टिमध्ये लाँग डिस्टेंस टाईम ऑफ फ्लाइट टेक्नॉलाजी इंटिग्रेट करण्यावर भर देत आहे. या फीचर्सचा उपयोग सिक्युरिटी, गेम, एग्युमेंटेड रिअ‍ॅल्टी अ‍ॅप्लिकेशन्समध्ये केला जाण्याची शक्यता आहे. 

 

Web Title: apple ihone se iphone 6 iphone 6s and iphone 6s plus sales stopped in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.