स्टीव्ह जॉब्स यांची स्वाक्षरी असलेल्या Apple II कंप्यूटर मॅन्युअलचा लिलाव; किंमत वाचून व्हाल हैराण 

By सिद्धेश जाधव | Published: August 23, 2021 07:34 PM2021-08-23T19:34:22+5:302021-08-23T19:34:30+5:30

Auction of Apple II computer manual: Apple II मॅन्युअल 7,87,484 डॉलर (सुमारे 5.85 कोटी रुपये) मध्ये Jim Irsay यांनी लिलावात विकत घेतला.  

Apple II manual signed by Steve Jobs sells at auction for 787484 us dollers | स्टीव्ह जॉब्स यांची स्वाक्षरी असलेल्या Apple II कंप्यूटर मॅन्युअलचा लिलाव; किंमत वाचून व्हाल हैराण 

स्टीव्ह जॉब्स यांची स्वाक्षरी असलेल्या Apple II कंप्यूटर मॅन्युअलचा लिलाव; किंमत वाचून व्हाल हैराण 

Next

Apple II मॅन्युअल 7,87,484 डॉलर (सुमारे 5.85 कोटी रुपये) मध्ये विकले गेले. या मॅन्युअलवर टेक कंपनी अ‍ॅपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांनी स्वाक्षरी केली होती. ही सही 1980 मध्ये करण्यात आली होती. अमेरिकन फुटबॉल संघ Indianapolis Colts चे मालक Jim Irsay यांनी हे मॅन्युअल विकत घेतले आहे.   

196 पानी मॅन्युअलच्या टेबल ऑफ कंटेंटच्या समोर निळ्या शाहीने स्टीव्ह जॉब्स यांनी सही केली आहे. जॉब्ससह अ‍ॅपलचे दुसरे सीईओ आणि गुंतवणूकदार Mike Markkula यांची देखील स्वाक्षरी आहे. सही सोबत एक संदेश देखील जॉब्स यांनी मॅन्युअलचे मालक ज्युलियन यांच्यासाठी लिहिला आहे. त्यांनी लिहिले आहे कि, ज्युलियन तुझी पिढी सर्वप्रथम कंप्यूटरसह मोठी झाली आहे. जा जग बदल! स्टीव्ह जॉब्स, 1980. हे देखील वाचा: गेमिंग चिपसेटसह Redmi 10 Prime येणार भारतात; सप्टेंबरमध्ये होऊ शकतो लाँच

अ‍ॅप्पलचे युनायटेड किंग्डममधील वितरक Michael Brewer यांचा पुत्र Julian Brewer 1980 साली बेडरूममध्ये Apple II वर गेम्स लिहीत होते. त्यावेळी त्यांच्या घरी Steve Jobs आणि Mike Markkula आले होते. तेव्हा त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या मॅन्युअलवर जॉब्स यांची दुर्मिळ सही घेतली. हे देखील वाचा: लई भारी! आता एक क्लिकमध्ये कळणार शरीरातील पाण्याचे प्रमाण; Apple Watch मध्ये मिळू शकतो हायड्रेशन सेन्सर

RR Auction ने जॉब्स यांच्या आयुष्याशी निगडित काही वस्तूंचा लिलाव केला आहे. यात एका पत्राचा देखील समावेश आहे. ज्यात जॉब्स यांनी लिहिले आहे कि, “I'm afraid I don't sign autographs”. हे पात्र 4,79,939 डॉलर (सुमारे 3.56 कोटी रुपये) मध्ये विकले गेले.  

Web Title: Apple II manual signed by Steve Jobs sells at auction for 787484 us dollers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.