खुशखबर! फेस अनलॉक फिचरमध्ये मोठा बदल; फेस मास्क लावून देखील फोन होणार अनलॉक, असं येईल वापरता
By सिद्धेश जाधव | Published: January 28, 2022 05:27 PM2022-01-28T17:27:52+5:302022-01-28T17:28:38+5:30
Apple नं iPhone युजर्ससाठी iOS 15.4 च्या बीटा व्हर्जनमध्ये नवीन बायोमेट्रिक फीचर दिलं आहे. या फीचरच्या माध्यमातून युजर आता मास्क घालून सुद्धा फेस अनलॉक वापरू शकतील.
Apple iPhone च्या फेस अनलॉक फिचरमध्ये मोठा बदल होणार आहे. आता मास्क लावून देखील फोन अनलॉक करता येईल. हे फिचर iOS 15.4 च्या बीटा व्हर्जनमध्ये दिसलं आहे. या बीटा अपडेटमध्ये मास्क लावून सुद्धा फेस आयडी इनेबल करण्याचा पर्याय मिळेल आणि फिचर Apple Pay सह अनेक अॅप्ससाठी देखील वापरता येईल.
गेल्या दोन वर्षांत जगभरातील युजर्सना मास्कचा वापर करावा लागला आहे. कोरोना काळात युजर्सना iPhone अनलॉक करण्यासाठी वारंवार फेस मास्क काढावा लागतो. यावर तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली होती. म्हणून iOS 15.4 च्या बीटा व्हर्जनमधील या नवीन फीचरच्या मदतीनं युजर मास्क न काढता iPhone अनलॉक करू शकतील.
सध्या iOS 15.4 च्या बीटा व्हर्जनमध्ये आलेलं हे फिचर लवकरच जगभरातील युजर्ससाठी उपलब्ध होईल. हे फिचर iPhone अनलॉक तर करेलच परंतु त्याचबरोबर Apple Pay तसेच बायोमेट्रिक सपोर्ट असलेले अन्य थर्ड पार्टी अॅप देखील याचा वापर करू शकतील. यात iPhone 12 आणि iPhone 13 सीरीजच्या डिवाइसेजचा समावेश असेल. तर iPhone 11 आणि त्याआधीच्या डिवाइसेजवर Apple Watch च्या माध्यमातून फोन अनलॉक करण्याचं फिचर वापरू शकतील.
हे देखील वाचा:
घरच्या पार्टीची शान वाढवेल सोनीच्या नव्या साउंडबारचा आवाज; इतक्या किंमतीत मिळणार 330W आउटपुट