लोकप्रिय iPhone होणार बंद; ...म्हणून Apple देणार फॅन्सना जोरदार झटका
By सिद्धेश जाधव | Published: April 19, 2022 04:35 PM2022-04-19T16:35:11+5:302022-04-19T16:37:31+5:30
Apple यावर्षी आपला लोकप्रिय आयफोन बंद करू शकते. हा फोन जुना आणि स्लो झाल्यामुळे कंपनी हा निर्णय घेऊ शकते.
Apple नेहमी दर्जेदार डिवाइस बाजारात सादर करत असते. तसेच नवीन डिवाइस बाजारात आल्यावर कंपनी जुने मॉडेल्स बंद करते किंवा त्यांची किंमत कमी करते. यामुळे ग्राहकांना नव्या डिवाइसेजच्या माध्यमातून चांगला अनुभव मिळत राहतो. त्यानुसार यावर्षीच्या शेवटी कंपनी iPhone 14 सीरीज लाँच करणार आहे. परंतु ही नवीन सीरिज येताच लोकप्रिय Apple iPhone 11 सीरिज बंद केली जाऊ शकते.
यावर्षीच्या शेवटी येणारी नवीन स्मार्टफोन सीरिज Apple iPhone 13 सीरीजची जागा घेईल. परंतु त्याचबरोबर iPhone 11 सीरीज बंद करण्याचं काम देखील करण्यात येईल, अशी माहिती iDropNews नं दिली आहे. विशेष म्हणजे iPhone 11 सीरिजमुळे ग्राहक नव्या iPhone SE 2022 कडे लक्ष देत नाहीत. सर्वात स्वस्त 5G आयफोनची विक्री वाढवण्यासाठी देखील कंपनी iPhone 11 बाजारातून हटवू शकते. 2019 मध्ये आलेला Apple iPhone 11 स्मार्टफोन 2020 मध्ये जगभरात सर्वाधिक विकला गेलेला स्मार्टफोन होता.
म्हणून बंद करणार फोन
iPhone 11 बंद करण्यामागे अनेक कारणं सांगितली जात आहेत. यातील एक कारण म्हणजे iPhone SE 2022 च्या तुलनेत iPhone 11 खूप जुना आणि स्लो फोन आहे. परंतु यात मोठा डिस्प्ले आणि जास्त कॅमेरे असल्यामुळे लोक जुन्या फ्लॅगशिपची निवड करत आहेत. परिणामी iPhone SE 2022 ची विक्री कंपनीच्या अपेक्षेपेक्षा कमी होत आहे. म्हणून कदाचित हा निर्णय घेतला जाऊ शकतो.
ही फक्त लीक झालेली माहिती आहे, अॅप्पलनं याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. आयफोन 14 सीरिज लाँच झाल्यावर iPhone 12 सीरीजची किंमत देखील कमी करण्यात येईल. किंमतीच्या बाबतीत ही सीरिज iPhone 11 ची जागा घेईल, असं देखील रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.