भारतात बनणारा iPhone 13 मिळतोय स्वस्तात? असा डिस्काउंट याआधी कधीच मिळाला नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 06:22 PM2022-04-20T18:22:09+5:302022-04-20T18:25:02+5:30
Apple iPhone 13 ची किंमत अॅमेझॉनवर खूप कमी करण्यात आली आहे. त्यामुळे जर तुम्ही हा आयफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या संधीचा फायदा घेऊ शकता.
Apple iPhone ची किंमत त्यांच्या कलर व्हेरिएंटनुसार बदलत जाते. काही कलर व्हेरिएंट खूप स्वस्तात उपलब्ध होतात, तर काही मॉडेलसाठी जास्त पैसे मोजावे लागतात. त्यामुळे तुम्ही जर नवीन आयफोन घेण्याचा विचार करत असाल तर ही गोष्ट लक्षात असू दयावी. Apple iPhone 13 128GB Red व्हेरिएंट देखील या लाईनअपमधील इतर मॉडेल्सच्या तुलनेत सर्वात स्वस्त आहे. ही ऑफर फक्त ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉनवर उपलब्ध आहे.
Apple iPhone 13 ची किंमत आणि ऑफर
Apple iPhone 13 128GB Red ची किंमत अॅमेझॉनवर 71,990 रुपये ठेवण्यात आली आहे. इतर कलर व्हेरिएंट 74,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे Apple अजूनही iPhone 13 अधिकृतपणे 79,990 रुपयांमध्ये विकत आहे. तसेच तुम्ही एक्सचेंज ऑफरचा वापर करून अॅमेझॉनवरून 12,500 रुपयांपर्यंतची बचत करू शकता. तसेच एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्ड धारकांना 5,000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. म्हणजे हा Apple iPhone 13 तुम्ही फक्त 66,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
स्वदेशी iPhone 13
Apple iPhone 13 हा कंपनीचा लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे. हा भारतातील अनेकांच्या स्वप्नातील स्मार्टफोन आहे. कंपनीच्या अनेक स्मार्टफोन्सची निर्मिती Foxconn कंपनी करते. आता फॉक्सकॉनच्या चेन्नई येथील प्लांटमध्ये आता iPhone 13 निर्मिती सुरु झाली आहे. लवकरच Foxconn व्यतिरिक्त Wistron आणि Pegatron देखील हा फोन असेम्ब्ल करतील.
Apple iPhone 13 चे स्पेसिफिकेशन्स
Apple iPhone 13 मध्ये 6.1 इंचाचा रेटिना डिस्प्ले देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 12MP चे दोन सेन्सर आहेत. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 12MP चा फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आली आहे. यात प्रोसेसिंगसाठी कंपनीची A15 बायोनिक चिप देण्यात आली आहे. iPhone 13 मध्ये 128GB स्टोरेज देण्यात आली आहे.