iPhone 13 झाला स्वस्त, डिस्काउंटसह विकत घ्या 512GB मेमरी असलेला हा दमदार फोन 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 01:29 PM2022-03-16T13:29:58+5:302022-03-16T13:30:13+5:30

iPhone 13 Discount: Amazon वरून iPhone 13 खूप स्वस्तात विकत घेता येत आहे. थेट डिस्काउंट तर आहेच परंतु एसचेंज ऑफरमुळे हा फोन घेणं अधिक सोपं झालं आहे.  

Apple iPhone 13 Price Discount No Cost EMI And Exchange Offer On Amazon Check Full Details  | iPhone 13 झाला स्वस्त, डिस्काउंटसह विकत घ्या 512GB मेमरी असलेला हा दमदार फोन 

iPhone 13 झाला स्वस्त, डिस्काउंटसह विकत घ्या 512GB मेमरी असलेला हा दमदार फोन 

Next

Apple नं काही दिवसांपूर्वी आपला सर्वात स्वस्त 5G फोन iPhone SE 3 सादर केला आहे. परंतु हा फोन फ्लॅगशिप अनुभव देत नाही. त्यामुळे तुम्ही जर फ्लॅगशिप आयफोन घेण्याचा विचार करत असाल तर Amazon वर iPhone 13 डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे. या फोनच्या 128GB, 256GB आणि 512GB अशा तीन स्टोरेज मॉडेलवर ही सूट उपलब्ध आहे.  

iPhone 13 वरील ऑफर 

iPhone 13 वर अ‍ॅमेझॉन 6000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट देत आहे. यासाठी तुम्हाला ICICI, SBI आणि Amazon Pay ICICI क्रेडिट कार्डचा वापर करावा लागेल. तसेच Kotak बँकेच्या कार्डवर देखील ही सूट मिळेल. डिस्काउंटनंतर iPhone 13 128GB स्टोरेज व्हेरिएंट 73,990 रुपयांच्या ऐवजी 67,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

एक्सचेंज ऑफर 

तुम्ही तुमचा जुना फोन देऊन आणखीन बचत करू शकता. Amazon च्या माध्यमातून 15,600 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर मिळत आहे. ही सवलत तुमच्या फोनच्या ब्रँड, कंडिशन आणि मॉडेलवर अवलंबून असते. या ऑफरचा पुरेपूर फायदा मिळाल्यास iPhone 13 चा 128GB स्टोरेज मॉडेल 52,390 रुपयांमध्ये घरी आणता येईल. 

Apple iPhone 13 चे स्पेसिफिकेशन्स 

Apple iPhone 13 मध्ये 6.1 इंचाचा रेटिना डिस्प्ले देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 12MP चे दोन सेन्सर आहेत. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 12MP चा फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आली आहे. यात प्रोसेसिंगसाठी कंपनीची A15 बायोनिक चिप देण्यात आली आहे. iPhone 13 मध्ये 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. 

Web Title: Apple iPhone 13 Price Discount No Cost EMI And Exchange Offer On Amazon Check Full Details 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.