वेगवान डिस्प्लेसह iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max लाँच; जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमत
By सिद्धेश जाधव | Published: September 15, 2021 12:44 AM2021-09-15T00:44:09+5:302021-09-15T09:53:36+5:30
iPhone 13 Pro And iPhone 13 Pro Max Price: iPhone 13 Pro ची किंमत 1,19,900 रुपयांपासून सुरु होईल. तर iPhone 13 Pro Max स्मार्टफोनचा बेस मॉडेल 1,29,900 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
टेक दिग्गज Apple ने मंगळवारी 14 सप्टेंबर रोजी झालेल्या ‘California Streaming’ नावाच्या इव्हेंटमधून आपली बाह्यप्रतिक्षीत iPhone 13 सीरिज सादर केली आहे. Apple Event 2021 च्या मंचावरून कंपनीने iPhone 13 सीरिजमध्ये iPhone 13 mini, iPhone 13, iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max असे चार मॉडेल्स सादर केले आहेत. त्याचबरोबर कंपनीने Apple Watch Series 7 स्मार्टवॉच आणि दोन iPad मॉडेल्स देखील लाँच केले आहेत. या लेखात आपण या सीरिजमधील iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max यांची माहिती घेणार आहोत.
iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max चे स्पेसिफिकेशन्स
iPhone 13 सीरिजमध्ये जुन्या iPhone 12 Pro च्या तुलनेत छोटी नॉच देण्यात आली आहे. तसेच डिजाईनमध्ये देखील अनेक बदल करण्यात आले आहेत. Apple च्या सर्वात पॉवरफुल iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max मध्ये फरक फक्त आकाराचा आहे. iPhone 13 Pro मध्ये 6.1-इंचाचा डिस्प्ले मिळतो, तर iPhone 13 Pro Max मधील डिस्प्ले 6.7-इंचाचा आहे. हे दोन्ही मॉडेल कंपनीने Super Retina XDR डिस्प्ले पॅनलसह सादर केले आहेत. जे 1000 निट्सच्या मॅक्सिमम ब्राईटनेसला सपोर्ट करतात. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 10Hz-120Hz दरम्यान बदलत राहतो.
प्रोसेसिंगसाठी यात अॅप्पलची A15 Bionic चिप देण्यात आली आहे. जी 5 नॅनोमीटर टेक्नॉलॉजीवर बनवण्यात आली आहे. यात दोन हाय परफॉर्मिंग कोर आणि चार हाय एफिशन्सी कोर मिळतात. आयफोन 13 मधील प्रो लाईनअपमध्ये 6 कोर असलेला जीपीयू मिळतो. याची बॅटरी लाईफ देखील सुधारण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. यात नव्या अल्ट्रा वाईड, वाईड आणि टेलीफोटो कॅमेऱ्याचा समावेश करण्यात आला आहे.
iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max ची किंमत
iPhone 13 Pro ची किंमत 1,19,900 रुपयांपासून सुरु होईल. तर iPhone 13 Pro Max स्मार्टफोनचा बेस मॉडेल 1,29,900 रुपयांमध्ये विकत घेता येईल. 17 सप्टेंबरपासून भारतासह 30 देशांमध्ये iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max प्री ऑर्डरसाठी उपलब्ध होतील, तर 24 तारखेपासून हे फोन्स खरेदी करता येतील.