भारतात होणार Apple iPhone 13 ची निर्मिती, किंमत होणार का कमी?
By सिद्धेश जाधव | Published: April 11, 2022 07:29 PM2022-04-11T19:29:38+5:302022-04-11T19:29:44+5:30
Apple चा लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन iPhone 13 आता भारतात निर्माण होऊ लागला आहे.
Apple iPhone 13 हा कंपनीचा लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे. हा भारतातील अनेकांच्या स्वप्नातील स्मार्टफोन आहे. कंपनीच्या अनेक स्मार्टफोन्सची निर्मिती Foxconn कंपनी करते. आता फॉक्सकॉनच्या चेन्नई येथील प्लांटमध्ये आता iPhone 13 निर्मिती सुरु झाली आहे. लवकरच Foxconn व्यतिरिक्त Wistron आणि Pegatron देखील हा फोन असेम्ब्ल करतील.
Apple India च्या प्रवक्त्यांनी ET Telecom ला भारतात iPhone 13 ची असेम्ब्ली सुरु झाल्याची माहिती दिली आहे. “तसेच या फोनबाबत आपण खूप उत्साहित आहोत. हा फोन सुंदर डिजाइन आणि अॅडव्हान्स कॅमेरा सिस्टमसह येतो, त्यामुळे फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफी करतायेते. तसेच, यात A15 Bionic चिप देण्यात आली आहे, ज्यामुळे परफॉर्मन्स सुधारते,” असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
किंमतीवर होणार का परिणाम?
एक्सपर्ट्सनुसार, भारतात iPhone 13 ची निर्मिती झाल्यामुळे फोनच्या किंमतीवर परिणाम होणं अपेक्षित आहे. परंतु याआधी देखील ज्या आयफोन्सची निर्मिती देशात झाली त्यांच्या किंमती कंपनीनं कमी केल्या नव्हत्या. त्यामुळे लोकल प्रोडक्शनमुळे जो फायदा होईल तो अॅप्पल स्वतःकडे ठेवण्याची शक्यता जास्त आहे.
Apple iPhone 13 चे स्पेसिफिकेशन्स
Apple iPhone 13 मध्ये 6.1 इंचाचा रेटिना डिस्प्ले देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 12MP चे दोन सेन्सर आहेत. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 12MP चा फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आली आहे. यात प्रोसेसिंगसाठी कंपनीची A15 बायोनिक चिप देण्यात आली आहे. iPhone 13 मध्ये 128GB स्टोरेज देण्यात आली आहे.