iPhone 14 मध्ये मिळणार चिनी कंपनीचा डिस्प्ले; सॅमसंगला दिला डच्चू?  

By सिद्धेश जाधव | Published: April 23, 2022 04:05 PM2022-04-23T16:05:22+5:302022-04-23T16:05:51+5:30

Apple iPhone 14 मध्ये चिनी डिस्प्ले दिला जाऊ शकतो. अ‍ॅप्पलनं यासाठी चिनी मॅन्युफॅक्चरर BOE सोबत सौदा केला आहे.  

Apple iPhone 14 Models Will Get BOE OLED Display   | iPhone 14 मध्ये मिळणार चिनी कंपनीचा डिस्प्ले; सॅमसंगला दिला डच्चू?  

iPhone 14 मध्ये मिळणार चिनी कंपनीचा डिस्प्ले; सॅमसंगला दिला डच्चू?  

Next

Apple iPhone 14 सीरीजची माहिती लीक होण्यास गेल्यावर्षीपासून सुरुवात झाली आहे. एक-एक करून या लाइनअपचे स्पेक्स देखील समोर येऊ लागले आहेत. आता आयफोन 14 संबंधित नवीन रिपोर्ट समोर आला आहे त्यानुसार, iPhone 14 मध्ये चिनी डिस्प्लेचा वापर केला जाऊ शकतो. यासाठी OLED पॅनल बनवणाऱ्या चिनी कंपनीशी करार देखील करण्यात आला आहे.  

रिपोर्टनुसार, डिस्प्ले बनवणाऱ्या चिनी कंपनी BOE आणि Apple मध्ये iPhone 14 च्या डिस्प्लेचा करार झाला आहे. यासाठी अमेरिकन कंपनी 50 मिलियन Yuan (जवळपास 5.8 कोटी रुपये) देणार आहे. चिनी कंपनी iPhone 14 च्या डिस्प्लेची निर्मिती याच तिमाहीत सुरु करेल. विशेष म्हणजे Samsung नंतर BOE जगातील दुसरी OLED डिस्प्ले बनवणारी कंपनी आहे.  

सॅमसंग असताना चिनी कंपनी का?   

अ‍ॅप्पल आपल्या डिवाइसमध्ये सॅमसंगच्या डिस्प्लेचा वापर करते, हे अनेकांना माहित आहे. मग असं असताना कंपनीनं सॅमसंग ऐवजी चिन मधील कंपनीची निवड का केली असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. BOE सध्या फक्त अ‍ॅप्पल आयफोन 14 साठी 6.1 इंचचा पॅनल बनवणार आहे. आयफोन 14 सीरीजमधील iPhone 14 Pro, iPhone 14 Max आणि iPhone 14 Pro Max या प्रीमियम मॉडेलसाठी चिनी पॅनेल्सचा वापर केला जाणार नाही. प्रीमियम डिवाइसेजमध्ये दक्षिण कोरियन कंपनी Samsung आणि LG चे डिस्प्ले पॅनल देण्यात येतील.  

विशेष म्हणजे BOE सध्या जुन्या iPhone च्या मॉडेल्सचे रिप्लेसमेंट डिस्प्ले देखील बनवत आहे. तसेच MacBook आणि iPad चे डिस्प्ले बनवण्याची जबाबदारी देखील या कंपनींकडे देण्यात आली आहे, हे पॅनल आगामी iPads आणि MacBook मध्ये वापरले जातील.  

Web Title: Apple iPhone 14 Models Will Get BOE OLED Display  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.