तब्बल 2TB स्टोरेजसह येऊ शकतो iPhone 14 Pro आणि Pro Max; ‘हे’ नवीन फिचर घेणार जास्त मेमरी  

By सिद्धेश जाधव | Published: October 6, 2021 11:59 AM2021-10-06T11:59:01+5:302021-10-06T12:00:35+5:30

Apple iPhone 14 Update: Apple च्या आगामी iPhone 14 सीरिजचे लिक्स आणि रिपोर्ट्स येण्यास आतापासूनच सुरुवात झाली आहे. आता आगामी आयफोन्सच्या स्टोरेज व्हेरिएंटची माहिती लीक झाली आहे.

Apple iphone 14 pro iphone 14 pro max to have 2tb storage next year here is why  | तब्बल 2TB स्टोरेजसह येऊ शकतो iPhone 14 Pro आणि Pro Max; ‘हे’ नवीन फिचर घेणार जास्त मेमरी  

हा प्रतीकात्मक फोटो आहे. (सौजन्य: macrumors)

googlenewsNext

अॅपलच्या आगामी iPhone 14 ची माहिती आयफोन 13 लाँच होण्याआधीपासूनच येत आहे. आगामी आयफोन सीरिज सादर होण्यासाठी अजून एक वर्षाचा कालावधी आहे. रिपोर्ट्समधून अ‍ॅप्पल आयफोन 14 च्या डिजाइन आणि इतर फीचर्सची माहिती आली आहे. आता आगामी आयफोन सीरिजच्या स्टोरेज मॉडेलची माहिती लीक झाली आहे. रिपोर्टनुसार, Apple iPhone 14 लाईनअपमध्ये 2TB स्टोरेज असलेला मॉडेल देखील मिळू शकतो.  

अ‍ॅप्पल आयफोन 13 सीरीजच्या मॅक्सिमम स्टोरेजच्या तुलनेत आगामी आयफोनमधील स्टोरेज दुप्पट करू शकते. MyDrivers ने 2022 मध्ये लाँच होणाऱ्या iPhone 14 सीरीजमध्ये 2TB स्टोरेज असेल, अशी माहिती दिली आहे. यावर्षी iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max च्या हायएंड व्हेरिएंटमध्ये 1TB स्टोरेज देण्यात आली आहे. पुढल्या वर्षी फक्त iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max मधेच 2 टेराबाईट मेमरी मिळू शकते.  

जास्त स्टोरेज मागील कारण  

कंपनी आपल्या नव्या कॅमेरा फीचर्समुळे आगामी आयफोनमध्ये दुप्पट मेमरी देण्याचा विचार करत आहे. याचे उदाहरण यावर्षी सादर झालेल्या आयफोन लाईनअपमधूनच मिळाले आहे. सध्याच्या आयफोन 13 प्रो मॉडेल्समध्ये तुम्हाला 30fps वर 4K ProRes फुटेज शूट करता येतात. परंतु हे फिचर फक्त 256GB व्हेरिएंटवर वापरता येते. 128GB स्टोरेज असलेल्या आयफोन 13 प्रोवर फक्त 30fps 1080p ProRes फुटेज कॅप्चर करता येतात. ProRes मोड कॅमेऱ्यातून रेकॉर्ड केलेली सर्वच माहिती साठवून ठेवतो जेणेकरून एडिटिंगच्या वेळी त्या डेटाचा वापर करता येईल. iPhone 14 सीरीजमध्ये देखील हे फिचर मिळू शकते त्यामुळे आगामी आयफोन्समधील स्टोरेज दुप्पट केली जाऊ शकते.  

Web Title: Apple iphone 14 pro iphone 14 pro max to have 2tb storage next year here is why 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.