iPhone 14 Series: आता Apple ही होणार अपग्रेड?; 48MP कॅमेरा, 8GB रॅमसह iPhone 14 येण्याची शक्यता
By सिद्धेश जाधव | Published: December 15, 2021 01:18 PM2021-12-15T13:18:38+5:302021-12-15T15:37:25+5:30
iPhone 14 Series: iPhone 14 Pro पंच होल डिस्प्लेसह सादर केला जाऊ शकतो. तसेच यात लाईटनिंग पोर्टच्या ऐवजी USB-C पोर्ट मिळेल. अशा अनेक अपग्रेडसह आगामी आयफोन सीरिज बाजारात येऊ शकते.
Apple च्या आगामी iPhone 14 सीरिजच्या लाँचसाठी अजून बराच कालावधी आहे. परंतु iPhone 13 लाँच होण्याआधीपासूनच नव्या या लाईनअपची माहिती येऊ लागली होती. त्यामुळे आतापर्यंत iPhone 14 लाईनअपची बरीचशी माहिती समोर आली आहे. नव्या रिपोर्टनुसार, iPhone 14 Pro मॉडेल अनेक अपग्रेडसह लाँच केला जाऊ शकतो. हे अपग्रेड अँडॉईडमध्ये नवीन नाहीत परंतु आयफोन प्रेमींसाठी हे खूप महत्वाचे ठरू शकतात.
लिक्सनुसार, आगामी आयफोन 14 प्रो पंच होल डिस्प्लेसह सादर केला जाऊ शकतो. तसेच यात लाईटनिंग पोर्टच्या ऐवजी USB-C पोर्ट मिळेल, असा दावा काही रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. आता iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max मध्ये 48-मेगापिक्सेल कॅमेरा दिला जाऊ शकतो, अशी माहिती MacRumors नं दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, Apple iPhone 14 Pro मॉडेलमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. या सेटअपमध्ये 48MP चा मुख्य सेन्सर मिळेल, त्याचबरोबर 12MP ची अल्ट्रा वाईड आणि टेलीफोटो लेन्स दिली जाऊ शकते. फक्त कॅमेरा सेटअप नव्हे तर आगामी सीरिज रॅम अपग्रेडसह देखील सादर केली जाईल. iPhone 14 Pro मॉडेलमध्ये 8GB रॅम दिला जाईल, अशी माहिती MacRumors नं दिली आहे. iPhone 13 Pro मध्ये मात्र 6GB RAM देण्यात आला होता.
नवीन iPhone 14 Pro मॉडेल 8K व्हिडीओ रेकॉर्डिंग दिली जाऊ शकते, असा दावा अनॅलिस्ट मिंग चीं कू यांनी याआधीच केलं आहे. स्टोरेज पाहता नवीन iPhone 14 मॉडेलमध्ये 64GB की स्टोरेज दिली जाऊ शकते. iPhone 14 मॉडेलमध्ये 120Hz रिफ्रेश दिला जाऊ शकतो तर काही रिपोर्ट्समध्ये हे फिचर फक्त Pro मॉडेलमध्ये असेल, असं सांगण्यात आलं आहे.