आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली आयफोन असेल Apple iPhone 14 Pro; सर्वात जास्त रॅमसह येणार बाजारात 

By सिद्धेश जाधव | Published: March 14, 2022 12:14 PM2022-03-14T12:14:56+5:302022-03-14T12:15:03+5:30

Apple iPhone 14 Pro आतापर्यंतच्या सर्वात शक्तिशाली आयफोन असू शकतो. या फोनच्या लीक झालेल्या स्पेक्सवरून हा अंदाज लावला जात आहे.  

Apple iPhone 14 Pro With A16 Bionic Soc And 6GB RAM Will Have Different Features Than Regular iPhone 14  | आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली आयफोन असेल Apple iPhone 14 Pro; सर्वात जास्त रॅमसह येणार बाजारात 

आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली आयफोन असेल Apple iPhone 14 Pro; सर्वात जास्त रॅमसह येणार बाजारात 

Next

Apple ची आगामी iPhone 14 सीरीज खूप शक्तिशाली स्पेसिफिकेशन्ससह बाजारात येईल. या सीरिजच्या स्टँडर्ड आणि प्रो मॉडेलमध्ये मोठा फरक असू शकतो, अशी माहित टिपस्टर मिंग-ची-कुओ यांनी दिली आहे. त्यानुसार Apple iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max मध्ये A16 Bionic चिपसेट मिळेल, तर iPhone 14 आणि iPhone 14 Max जुना A15 Bionic चिपसेट मिळेल. 

स्पेक्समधील बदल  

Apple iPhone 14 Series चे सर्व फोन्स 6GB RAM सह बाजारात येऊ शकतात. जो आयफोन 13 सीरिजमधील 4GB रॅम पेक्षा कितीतरी जास्त असेल. iPhone 14 सीरीजमध्ये LPDDR5 RAM मिळेल, तर iPhone 13 सीरीजमध्ये LPDDR4X RAM देण्यात आला आहे. आगामी आयफोन सीरिजचे सर्व फोन्स ई-सिम सपोर्टसह येतील, त्यात फिजिकल सिम स्लॉट मिळणार नाहीत.  

डिजाईन देखील असेल वेगळी 

याआधी एका आयफोन सीरिजच्या दोन मॉडेल्समध्ये जास्त फरक दिसत नसे. आयफोन 14 सीरिजच्या प्रो आणि स्टँडर्ड मॉडेलमधील स्पेक्स नव्हे तर डिजाईनच्या बाबतीत देखील वेगवेगळे असेल. आगामी iPhone 14 Pro सीरीजमध्ये ड्युअल पंच-होल कट मिळेल. तर स्टँडर्ड मॉडेल्समध्ये नॉच डिजाईन मिळेल.  

हे देखील वाचा:

Web Title: Apple iPhone 14 Pro With A16 Bionic Soc And 6GB RAM Will Have Different Features Than Regular iPhone 14 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.