Apple करणार कमाल! सिम कार्डविना चालणार दोन्ही नेटवर्क, iPhone 14 मध्ये मिळणार नाही SIM कार्ड स्लॉट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 07:29 PM2021-12-29T19:29:09+5:302021-12-29T19:30:14+5:30
iPhone 14 स्मार्टफोन आयफोन युजर्ससाठी एक मोठा अपग्रेड असू शकतो. या डिवाइसमध्ये 48MP चा कॅमेरा आणि 8K व्हिडीओ रेकॉर्डिंग असे अपग्रेड मिळू शकतात.
Apple iPhone 14 चे लिक्स गेले कित्येक महिने येत आहेत. या लिक्समधून डिवाइसच्या डिजाइन, स्क्रीन आणि कॅमेरा स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. आता आलेल्या बातमीनुसार, कंपनी या सीरीजपासून आयफोनमध्ये फिजिकल SIM कार्ड स्लॉटला सपोर्ट बंद केला जाऊ शकतो. त्याऐवजी iPhone 14 Series मध्ये eSIM सपोर्ट मिळू शकतो.
ही टेक्नॉलॉजी काही नवीन नाही, सध्याच्या आयफोन मॉडेल्समध्ये देखील एक नॅनो सिम स्लॉट आणि एक eSIM मिळतो. या फिचरची सुरुवात अॅप्पलनं 2018 मध्ये आलेल्या iPhone XS पासून केली आहे. परंतु 2022 नंतर नॅनो सिम स्लॉट बंद केला जाईल आणि त्याजागी अजून e-SIM मिळेल. MacRumours च्या रिपोर्टनुसार , अॅप्पलनं अमेरिकेतील बड्या टेलिकॉम ऑपरेटर्सना eSIM-only स्मार्टफोनसाठी तयार होण्यास सांगितले आहे.
iPhone 14 चे लीक स्पेक्स
लिक्स आणि रिपोर्ट्सनुसार iPhone 14 मध्ये 48MP चा कॅमेरा असेल, जो 8K व्हिडीओ रेकॉर्डिंग करू शकेल. काही रिपोर्ट्सनुसार हा नवीन मोठा कॅमेरा फक्त आगामी आयफोनच्या प्रो मॉडेलमध्ये मिळेल. iPhone 14 लाइनअप मध्ये चार मॉडेल लाँच होऊ शकतात. ज्यात आयफोन 14 प्रो आणि आयफोन 14 प्रो मॅक्स दोन प्रीमियम हँडसेट असू शकतात. यावेळी आयफोन 14 मिनी सादर केला जाणार नाही.
हे देखील वाचा:
Jio युजर्सनी इकडे लक्ष द्या! या 7 चुका तुम्हाला करू शकतात 'कंगाल', आताही वेळ आहे
फक्त 500 रुपयांमध्ये आला 15 तास चालणारा Bluetooth Neckband; जाणून घ्या वैशिष्ट्ये