Apple iPhone 15 Ultra ची किंमत लॉन्चपूर्वी लीक, बजेटमध्ये बसणार का? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 12:50 PM2022-12-13T12:50:54+5:302022-12-13T12:52:11+5:30
Apple iPhone 15 Ultra Price: iPhone निर्माता Apple कंपनीने या वर्षी सप्टेंबरमध्ये iPhone १४ सीरीज लाँच केली होती.
Apple iPhone 15 Ultra Price: iPhone निर्माता Apple कंपनीने या वर्षी सप्टेंबरमध्ये iPhone १४ सीरीज लाँच केली होती. त्यानंतर बाजारात iPhone 15 ची चर्चा जोरात सुरू झाली आहे. आयफोनची नवी सीरिज २०२३ च्या लॉन्च होण्याची अपेक्षा नाही. आयफोन बद्दल यूजर्समध्ये इतकी क्रेझ आहे की iPhone 15 Ultra ची संभाव्य किंमत आणि फीचर्स लीक होत आहेत. नुकतंच एका अहवालात दावा करण्यात आलाय की आगामी iPhone 15 Ultra ची किंमत iPhone 14 Pro Max पेक्षा २०० डॉलरने (सुमारे १६,५०० रुपये) अधिक असू शकते.
कंपनी iPhone 15 Ultra जवळपास १,२९९ डॉलरच्या (१,०८,००० रुपये) सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करू शकते. फोर्ब्सनं LeaksApplePro च्या माध्यमातून दिलेल्या अहवालात याचा दावा केला आहे. वर्षातील सर्वात महाग iPhone - iPhone Pro Max ची मूळ किंमत १,०९९ डॉलर (सुमारे ९०,८०० रुपये) आहे. जर हे लीक खरे असेल तर आगामी iPhone 15 Ultra ची किंमत iPhone 14 Pro Max पेक्षा २०० डॉलर (सुमारे १६,५०० रुपये) जास्त असू शकते.
किमतीत सर्वात मोठी वाढ
आयफोनच्या इतिहासातील एका सीरिजच्या दुसऱ्या सीरिजच्या किमतीत झालेली ही सर्वात मोठी वाढ असेल. रिपोर्टनुसार, आगामी iPhone चे बेस मॉडेल 256GB स्टोरेज सह ऑफर केला जाऊ शकतो. त्याचवेळी, नवीन आयफोनच्या टॉप-व्हेरियंटमध्ये 1TB पर्यंत अंतर्गत स्टोरेज दिले जाऊ शकते, ज्यासाठी तुम्हाला १,७९९ डॉलर (सुमारे १,४८,००० रुपये) खर्च करावे लागतील.
टायटॅनियम बॉडी मिळेल
Apple iPhone 15 Ultra सध्याच्या A16 पेक्षा मजबूत चिपसेटच्या समर्थनासह लॉन्च केला जाऊ शकतो. आयफोन १४ सीरिजच्या तुलनेत नवीन आयफोनची रॅम जास्त असेल असं बोललं जात आहे. त्याचवेळी हा फोन प्रीमियम टायटॅनियम बॉडीसह ऑफर केला जाऊ शकतो. टायटॅनियम केवळ आयफोन-१५ अल्ट्राला प्रीमियम लूक देणार नाही तर ते आयफोनचे वजन देखील हलके करेल.
ड्युअल फ्रंट कॅमेरे आणि टाइप-सी पोर्ट
सध्याच्या आयफोन बॉडीच्या तुलनेत टायटॅनियम ३५ पट अधिक महाग आहे. नव्या iPhone मध्ये ड्युअल फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. असे झाल्यास, हा पहिला iPhone असेल ज्यामध्ये ड्युअल फ्रंट कॅमेरा उपलब्ध असेल. याशिवाय, iPhone प्रथमच USB Type-C चार्जिंग पोर्टसह लॉन्च केला जाऊ शकतो.