Apple iPhone 16 Launch Event : ३० मिनिटांत ८० टक्के चार्जिंग, आजवरचा मोठा डिस्प्ले; Apple Watch Series 10 लॉन्च

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 11:02 PM2024-09-09T23:02:46+5:302024-09-09T23:03:07+5:30

Apple iPhone 16 Launch Event : ॲपलनं सोमवारी आपली ॲपल वॉच सीरिज १० लॉन्च केली. Apple Watch Series 10 मध्ये कंपनीनं आपल्या आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्प्ले दिला आहे.

Apple iPhone 16 Launch Event 80 percent charging in 30 minutes big display ever Apple Watch Series 10 launch | Apple iPhone 16 Launch Event : ३० मिनिटांत ८० टक्के चार्जिंग, आजवरचा मोठा डिस्प्ले; Apple Watch Series 10 लॉन्च

Apple iPhone 16 Launch Event : ३० मिनिटांत ८० टक्के चार्जिंग, आजवरचा मोठा डिस्प्ले; Apple Watch Series 10 लॉन्च

Apple iPhone 16 Launch Event : ॲपलनं सोमवारी आपली ॲपल वॉच सीरिज १० लॉन्च केली. Apple Watch Series 10 मध्ये कंपनीनं आपल्या आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्प्ले दिला आहे. ॲपल वॉच सीरिज १० कंपनीची सर्वात थीन स्मार्टवॉच आहे. यामध्ये नवे वॉच फेसेस देण्यात आले आहे. तसंच हे वॉच ५० मीटर पर्यंत वॉटर रेझिस्टंस असल्याचं इव्हेंटदरम्यान सांगण्यात आलं.

दरम्यान, यावेळी पहिल्यांदाच ॲपलनं सोमवारच्या दिवशी  iPhones लॉन्च केले आहेत. १० सप्टेंबर रोजी मंगळवारी अमेरिकेत प्रेसिडन्शिअल डिबेट होणार आहे. त्यामुळेच नं सोमवारी आयफोन, आयवॉच लॉन्च करण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. यावेळी ॲपलनं गॅलेक्सी वॉच अल्ट्रा प्रमाणेच Sleep Apnea डिटेक्शन फीचर दिलं आहे. याशिवाय हे वॉच सीरिज १० हे वजनातही हलकं आहे, तसंच यात ३ कलर ऑप्शन मिळत आहे. यामध्ये ग्राहकांना टायटॅनियम वॉचचाही पर्याय देण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. याशिवाय तीन कलर ऑप्शन्ससह नवे स्ट्रॅप्सही मिळणार आहेत.

S10 चिपचा वापर

परफॉर्मन्ससाठी यामध्ये कंपनीनं S10 चिपचा वापर केला आहे. यामध्ये ग्राहकांना AI फीचर्सही मिळणार आहे. तसंच यामध्ये क्रॅश डिटेक्शनसारखे फीचर्सही असतील. यामध्ये डबल टॅपसारख्या फीचरचाही वापर करता येणार आहे. तसंच हे वॉच WatchOS 11 सोबत येईल. यामध्ये मशीन लर्निंग फीचर्स मिळणार आहेत. याची किंमी ३९९ डॉलर्सपासून सुरू होईल.

Apple Watch Ultra 2 लॉन्च

Apple Watch Ultra 2 देखील कंपनीनं लॉन्च केलं आहे. यामध्ये तुम्हाला जुन्या Apple Watch Ultra 2 सारखीच डिझाइन लँग्वेज मिळते. कंपनीनं यावेळी सॅटिन ब्लॅक कलर ऑप्शन दिला आहे. यात तुम्हाला स्लीप एपनिया डिटेक्शन फीचरही मिळेल. कंपनीनं पहिल्यांदाच एकापेक्षा अधिक रंगांमध्ये Apple Watch अल्ट्रा लॉन्च केले आहे.

Web Title: Apple iPhone 16 Launch Event 80 percent charging in 30 minutes big display ever Apple Watch Series 10 launch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.