Apple iPhone 16 Launch Event : डेडिकेटेड कॅमेरा बटण, Apple Intelligence आणि बरंच काही; iPhone 16 लॉन्च, किती आहे किंमत?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 11:38 PM2024-09-09T23:38:45+5:302024-09-09T23:39:12+5:30
Apple iPhone 16 Launch Event : आज ॲपलचं मेगा इव्हेंट पार पडलं. यावेळी ॲपलनं आयवॉच सीरिज १०, आयवॉच अल्ट्रा, इयरपॉड सीरिज ४ आणि आयफोन सीरिज १६ लॉन्च केली.
Apple iPhone 16 Launch Event : आज ॲपलचं मेगा इव्हेंट पार पडलं. यावेळी ॲपलनं आयवॉच सीरिज १०, आयवॉच अल्ट्रा, इयरपॉड सीरिज ४ आणि आयफोन सीरिज १६ लॉन्च केली. आयफोन सीरिज १६ मध्ये डेडिकेटेड कॅमेरा बटण, Apple Intelligence सारखे अनेक नवे फीचर्स दिले आहेत.
दरम्यान, यावेळी पहिल्यांदाच ॲपलनं सोमवारच्या दिवशी iPhones लॉन्च केले आहेत. १० सप्टेंबर रोजी मंगळवारी अमेरिकेत प्रेसिडन्शिअल डिबेट होणार आहे. त्यामुळेच नं सोमवारी आयफोन, आयवॉच लॉन्च करण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. आयफोन १६ मध्ये एक नवीन बटण देण्यात आलं आहे. कॅमेरा अॅक्टिव्हेट करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. तसंच कंपनीनं यावेळी आधीपेक्षा थोडी वेगळी कॅमेरा प्लेसमेंट दिलीये.
A18 चिपसेटचा वापर
यावेळी कंपनीने नॉन-प्रो आयफोनमध्येही नवा प्रोसेसरही दिला आहे. यापूर्वी कंपनीनं नॉन-प्रो आयफोन मॉडेलमध्ये जुना प्रोसेसर दिला होता. यावेळी आयफोन १६ मध्ये ३ नॅनोमीटर आर्किटेक्चरसह ६ कोअर्स असलेला अॅपल Apple A18 चिपसेट दिलाय.
Apple Intelligence चं जबरदस्त फीचर
आयफोन सीरिज १६ सोबत Apple Intelligence चं फीचरदेखील देण्यात आली आहे. हे एक प्रकारचं पर्सनल अॅडव्हान्स्ड एआय असिस्टंटचं काम करणार आहे. कंपनीने नवीन आयफोनच्या इतर अनेक फीचर्समध्ये ते इंटिग्रेट केलंय. गॅलरी, ई-मेलपासून चॅट मेसेजपर्यंत तुम्ही अॅपल इंटेलिजन्सचा वापर करू शकता. Apple Intelligence हे फीचर कंपनीनं Siri मध्ये इंटिग्रेट केलंय. Apple Intelligence हे पूर्णपणे मोफत असणार आहे. त्यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. पुढील महिन्यात अमेरिकेत हे वापरासाठी उपलब्ध होणार आहे.
कसा आहे कॅमेरा?
आयफोन सीरिज १६ मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आलंय. यातील प्रायमरी कॅमेरा ४८ मेगापिक्सेलचा देण्यात आलाय. तसंच अँटी रिफ्लेक्टिव्ह लेन्स कोटिंग, सेन्सर शिफ्ट OIS देखीलदेण्यात आलंय. तर यातील दुसरा कॅमरा १२ मेगा पिक्सेलचा अल्ट्रा वाईट कॅमेरा असेल. यामध्येदेखील अँटी रिफ्लेक्टिव्ह लेन्स कोटिंग आणि ऑटोफोकस सारखा फीचर देण्यात आलाय. याशिवाय यात डॉल्बी व्हिजन सपोर्टही देण्यात आलाय.
iPhone 16 चे स्पेसिफिकेशन्स
iPhone 16 मध्ये ६.१ इंचाचा स्क्रीन देण्यात येणार आहे. तर आयफोन १६ प्लसमध्ये ६.७ इंचाचा डिस्प्ले असेल. यामध्ये अॅक्शन बटणासोबत कॅमेरा कंट्रोल बटणही असेल. आयफोन १६ ची किंमत ७९९ डॉलर्स असेल, तर आयफोन १६ प्लसची किंमत ८९९ डॉलर्स इतकी असेल.
iPhone 16 Pro मध्ये काय आहे खास?
आयफोन १६ प्रोमध्ये ६.३ इंचाचा डिस्प्ले देण्यात आलाय तर, प्रो मॅक्स मॉडेल ६.९ इंचाच्या डिस्प्लेसह मिळणार आहे. हा सर्वात मोठा डिस्प्ले आहे. यात सर्वात थिन बेजल्स आहेत. आयफोन प्रो मॉडेल चार कलर ऑप्शनमध्ये मिळेल. यात सॉफ्ट आणि डार्क टायटॅनियम कलर ऑप्शनदेखील मिळणार आहेत. हे दोन्ही मॉडेल्स अॅपल इंटेलिजन्स सपोर्टसोबत येतील. आयफोन १६ प्रो मॉडेलमध्ये Apple A18 Pro चिपसेट देण्यात आलाय. यापूर्वीच्या चिपसेटच्या तुलनेत हा २० टक्के फास्ट काम करेल असा दावा करण्यात आलाय. आयफोन १६ प्रो मॅक्समध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी बॅटरी आहे.
iPhone 16 Pro कॅमेरा फीचर
iPhone 16 Pro मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आलाय. यामध्ये 48MP मेन कॅमेरा सेन्सर देण्यात आलाय. याशिवाय 48MP अल्ट्रावाईड कॅमेराही असेल. इतकंच नाही तर यात हायब्रिड फोकल पिक्सेल मिळतील. iPhone 16 Pro मध्ये 5x टेलिफोटो कॅमेरा देण्यात आला. या फोनच्या माध्यमातून 120fps वर 4K व्हिडीओ रेकॉर्ड करता येईल. याशिवाय कलर ग्रेडिंग सिस्टमही देण्यात आलंय. तुम्ही फोटो क्लिक केल्यानंतर फोटो स्पीड प्लेबॅक कंट्रोल करू शकता.
किती आहे किंमत?
आयफोन १६ प्रो च्या १२८ जीबी व्हेरिअंटची किंमत ९९९ डॉलर्सपासून सुरू होणार आहे. तर आयफोन १६ प्रो मॅक्सच्या २५६ जीबी व्हेरिअंटची किंमत ११९९ डॉलर्सपासून सुरू होईल.