Apple iPhone 16 Launch Event : बोलताना आवाज आपोआप होणार कमी, कानाच्या आरोग्याचीही काळजी घेणार; ॲपलचे नवीन Airpods झाले लाँच
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 11:19 PM2024-09-09T23:19:42+5:302024-09-09T23:24:18+5:30
Apple iPhone 16 Launch Event : हे Airpods आतापर्यंतचे सर्वोत्तम एअरपॉड्स आहेत.
Apple iPhone 16 Launch Event : Apple आज iPhone 16, iPhone 16 Plus, iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro लॉन्च करत आहे. याशिवाय Apple वॉचची एक नवीन सीरिजही लाँच केली आहे. आयफोनने फोन लाँच करण्याआधी H2 चिप असलेले नवीन Airpods लॉन्च केले आहेत. एरपोर्डची नवीन सीरीज जबरदस्त आहे.
हे Airpods आतापर्यंतचे सर्वोत्तम एअरपॉड्स आहेत. याचा वापर करून तुम्ही Siri वापरू शकता. सिरीशी बोलत असताना, आपण आपले डोके हलवून त्याला कमांड देऊ शकता. या व्यतिरिक्त, तुम्हाला उत्कृष्ट नॉइज कॅन्सलेशन मिळेल, यामुळे आजूबाजू सुरू असलेला गोंधळ तुम्हाला ऐकू येणार नाही. यामध्ये तुम्हाला टाइप-सी चार्जिंग पोर्ट मिळेल. याची किंमत १२९ डॉलर्सपासून सुरू होते. यामध्ये तुम्हाला वायरलेस चार्जिंग देखील मिळेल.
बोलताना आवाज अॅटोमॅटिक कमी होणार
तुम्हाला संगीत ऐकताना जवळच्या कोणाशीही बोलायचे असेल, तर नवीन एअरपॉड्स आपोआप ऑडिओ कमी करेल. जेणेकरून तुम्ही समोरच्याशी बोलू शकाल. याला ॲडॅप्टिव्ह नॉइज कॅन्सलेशनचा विस्तार म्हणता येईल. अलीकडेच सॅमसंगने गॅलेक्सी बड्स लाँच केले, यात सायरन डिटेक्शन फीचर आहे. सायरन वाजताच ऑडिओचा आवाज कमी होतो.
हिअरिंग प्रोटेक्शन
कंपनीने एअरपॉड्स प्रो मध्ये अनेक हेल्थ फिचर दिली आहेत. यापैकी, कानावर परिणाम होऊ नये म्हणून आरोग्य संस्थेशी भागीदारी देखील केली आहे. HQ चिपमध्ये मशीन लर्निंगचा वापर करण्यात आला आहे, हा वापरकर्त्यांना श्रवण संरक्षण देतो. यामध्ये श्रवण चाचणीची सुविधाही देण्यात आली आहे. हे एक आरोग्य फिचर आहे, हे तुम्हाला तुमची श्रवणशक्ती कशी आहे हे सांगेल. श्रवणशक्ती कमी झाल्यास ते तुम्हाला याची माहिती देईल.