सावधान! Apple iPhone आणि iPad युजर्सना सरकारकडून धोक्याचा इशारा; हॅकिंग टाळण्यासाठी त्वरित पाऊले उचला  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 12:30 PM2021-08-02T12:30:00+5:302021-08-02T12:31:05+5:30

Memory Corruption Vulnerability Apple: या मेमरी Corruption Vulnerability च्या मदतीने हॅकर्स दुरून तुमच्या डिवाइसवर खतरनाक कोड डिप्लॉय करू शकतात आणि तुमच्या डिवाइसवर नियंत्रण मिळवू शक्यता.

apple iphone and ipad user update your phone soon  | सावधान! Apple iPhone आणि iPad युजर्सना सरकारकडून धोक्याचा इशारा; हॅकिंग टाळण्यासाठी त्वरित पाऊले उचला  

सावधान! Apple iPhone आणि iPad युजर्सना सरकारकडून धोक्याचा इशारा; हॅकिंग टाळण्यासाठी त्वरित पाऊले उचला  

Next

भारत सरकारने iPhone आणि iPad युजर्सना आपले डिवाइस अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे. असे ना केल्यास हॅकर्स डिवाइस हॅक करू शकतात. भारतातील अधिकृत आयटी आणि सिक्योरिटी आर्गेनाइजेशन CERT-In (Indian Computer Emergency Response Team) ने Apple युजर्सना लवकरात लवकर iPhone आणि iPad अपडेट करण्यास सांगितले आहे. या आठवड्यात Apple ने जारी केलेल्या iOS 14.7.1 आणि iPadOS 14.7 मध्ये एक महत्वाचा बग फिक्स करण्यात आला आहे. या अपडेटमध्ये मेमरी करप्शन सारख्या zero-day vulnerability समस्येला दुरुस्त करण्यात आले आहे. या सुरक्षा दोषामुळे हॅकर्स सिस्टमवर कब्जा मिळवून तुमचे नुकसान करू शकतात.  

त्यामुळे सीईआरटी-इनने सर्व iPhone आणि iPad युजर्सना यासाठी सिक्योरिटी अलर्ट पाठवला आहे. या अलर्टमध्ये सर्व अ‍ॅप्पल डिवाइस iOS 14.7.1 आणि iPadOS 14.7.1 व्हर्जनवर अपडेट करण्यास सांगितले आहे. मेमरी करप्शनची ही समस्या iPhone 6s आणि त्यानंतर लाँच झालेल्या सर्व iPad Pro मॉडेल, iPad Air 2, iPad फिप्त जेनरेशन, iPad mini 4 आणि iPod Touch अश्या सर्व डिवाइसमध्ये आहे. MacOS देखील यातून वाचला नसून त्यासाठी macOS Big Sur 11.5.1 अपडेट जारी करण्यात आला आहे.

या मेमरी Corruption Vulnerability च्या मदतीने हॅकर्स दुरून तुमच्या डिवाइसवर खतरनाक कोड डिप्लॉय करू शकतात आणि तुमच्या डिवाइसवर नियंत्रण मिळवू शक्यता. हा धोखा इतका मोठा आहे कि टेस्लाचे मालक इलॉन मस्कने देखील याची दखल घेऊन आपले डिवाइस अपडेट करण्यास सांगितले आहे. भारत सरकारने देखील ऍप्पल युजर्सच्या सुरक्षेसाठी धोक्याचा इशारा दिला आहे.  

Web Title: apple iphone and ipad user update your phone soon 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.