Apple iPhone Event: आज लॉन्च होणार तीन नवे iPhone आणि बरंच काही
By सागर सिरसाट | Updated: September 12, 2017 18:12 IST2017-09-12T18:12:37+5:302017-09-12T18:12:37+5:30
टेक्नोलॉजीच्या आजच्या जगात ‘अॅपल’चा इव्हेंट म्हटलं की जोरदार चर्चा सुरू होतेच. एखादा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी जेवढा गाजावाजा सुरू असतो तसंच काहीसं अॅपलच्या इव्हेंटबाबत असतं.

Apple iPhone Event: आज लॉन्च होणार तीन नवे iPhone आणि बरंच काही
मुंबई, दि. 12 - टेक्नोलॉजीच्या आजच्या जगात ‘अॅपल’चा इव्हेंट म्हटलं की जोरदार चर्चा सुरू होतेच. एखादा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी जेवढा गाजावाजा सुरू असतो तसंच काहीसं अॅपलच्या इव्हेंटबाबत असतं. असाच एक खास इव्हेंट अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये आज 12 सप्टेंबर रोजी आयोजित केला आहे. यावेळी अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कूक आयफोन 8, आयफोन 8 प्लस आणि आयफोन X हे फोन लाँच करण्याची शक्यता आहे.
अॅपलने पहिला फोन लॉन्च करुन यंदा दहा वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने आयफोन X हा खास फोन लाँच केला जाणार आहे. आयफोन X हा कंपनीचा सर्वात महागडा फोन असण्याची शक्यता आहे. दहा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयफोन X हे नवं नाव दिलं जाण्याची शक्यता आहे.
अॅपलच्या या नव्या फोन्सची कोणते फीचर्स असणार आहेत याबाबत अॅपल लव्हर्समध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आज होणा-या मेगा इव्हेंटमध्ये एलटीई सपोर्टसह अॅपल वॉच 3 देखील लाँच होणार आहे. तसेच 4K रिझोल्युशनसह अॅपल टीव्हीही या इव्हेंटमध्ये लाँच केली जाण्याची शक्यता आहे. याशिवाय आयफोन, मॅकबुक आणि वॉचेससाठी आयओएसची नवी अपडेट या इव्हेंटमध्ये रिलीज केली जाण्याची शक्यता आहे.
iPhone 8, iPhone 8 + फीचर्स -
- वायरलेस चार्जिगची सुविधा असेल अशी चर्चा आहे.
- आयफोन 8 मध्ये 4.7 इंचाचा डिस्प्ले तर आयफोन 8 प्लस मध्ये 5.5 इंचाचा एचडी डिस्प्ले
-‘होम बटण’ नसेल
-‘फिंगर प्रिंट स्कॅनर’ असेल
- ड्युअल कॅमेरा सेटअप
- डिझाईनमध्येही काही बदल अपेक्षित
- आयफोन 8 आणि आयफोन 8 प्लसची बॅटरी लाईफ वाढलेली असेल