Apple iPhone मध्ये मिळणार Type-C पोर्ट; पण 'या' कास चार्जरनेच फोन चार्ज होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 01:48 PM2023-02-12T13:48:59+5:302023-02-12T13:50:13+5:30

नवीन नियमांमुळे Apple लवकरच USB Type-C पोर्ट असलेले iPhones लॉन्च करणार आहे.

Apple iPhone News: Apple iPhone will also get Type-C port; But the phone will be charged only with company charger | Apple iPhone मध्ये मिळणार Type-C पोर्ट; पण 'या' कास चार्जरनेच फोन चार्ज होणार

Apple iPhone मध्ये मिळणार Type-C पोर्ट; पण 'या' कास चार्जरनेच फोन चार्ज होणार

Next

Apple iPhone News: आजकाल जवळपास सर्वच मोबाईलमध्ये टाईप-सी(Type-C) चार्जिंग पोर्ट दिले जाते. पण, Apple iPhone याला अपवाद आहे. पण, आता एपलदेखील आपल्या आयफोनमध्ये USB Type-C पोर्ट देणार आहे. मोबाईल चार्जरच्या नियमामुळे आयफोनमध्ये यूएसबी टाइप-सी पोर्ट देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. पण, अशीही माहिती समोर आली आहे की, Android मोबाईलच्या टाइप-सी चार्जरने आयफोन चार्ज करता येणार नाही.

रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, अॅपल आपल्या आयफोन्ससाठी एक खास कस्टमाइज्ड यूएसबी टाइप-सी पोर्ट तयार करणार आहे. हे फोन फक्त आयफोन कंपनीकडून दिलेल्या चार्जरद्वारेच चार्ज केले जाऊ शकतील. गेल्या वर्षी युरोपियन युनियनने Apple ला चार्जिंग पोर्टमध्ये USB-C कनेक्टर देण्यास सांगितले होते. सध्या कंपनी आपल्या MacBook आणि iPad मध्ये USB Type-C पोर्ट देते. 

कस्टमाइज्ड टाइप-सी पोर्ट मिळेल
आपला वेगळेपणा जपण्यासाठी कंपनी कस्टमाइज्ड चार्जर तयार करणार आहे. iPhones मध्ये USB Type-C पोर्ट दिला जाईल, पण कंपनी त्यासाठी कस्टम इंटिग्रेटेड सर्किट किंवा IC इंटरफेस पोर्ट बनवू शकते. सध्या Apple आपल्या फोन्समध्ये लायटनिंग पोर्ट देते. यामध्ये बिल्ट इन ऑथेंटिकेशन प्रक्रिया दिली आहे. म्हणजेच, हे फोन फक्त आयफोनच्या चार्जरद्वारेच चार्ज केले जाऊ शकतात.

Web Title: Apple iPhone News: Apple iPhone will also get Type-C port; But the phone will be charged only with company charger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.