ठरलं तर! ‘या’ तारखेला येणार Apple चा सर्वात स्वस्त 5G iPhone; नवीन iPad आणि Mac देखील होणार लाँच
By सिद्धेश जाधव | Published: February 5, 2022 05:17 PM2022-02-05T17:17:54+5:302022-02-05T17:18:47+5:30
Apple Event: या इव्हेंटमध्ये iPhone SE 3 5G, नवीन iPad Air, आणि iOS 15.4 लाँच केले जाऊ शकतात. नवीन Mac कंपनीच्या Silicon सह सादर केला जाईल.
Apple लवकरच आपल्या लाँच इव्हेंटचं आयोजन करणार आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, 8 मार्चला एका व्हर्च्युअल इव्हेंटचं आयोजन टेक जाएंट करणार आहे. या इव्हेंटमध्ये iPhone SE 3 5G, नवीन iPad Air, आणि iOS 15.4 लाँच केले जाऊ शकतात. काही दिवसांपूर्वी iPhone SE 3 आणि नवीन iPads भारतात येणार असल्याची बातमी आली होती. जागतिक लाँच होताच हे डिवाइस भारतात उपलब्ध होतात कि नाही ते पाहावं लागेल.
Apple Event
रिपोर्टनुसार, नवीन Mac कंपनीच्या Silicon सह सादर केला जाईल. तसेच iOS 15.4 अपडेट देखील नव्या फीचर्ससह सादर केला जाईल. ज्यात Face ID मास्क सपोर्ट, यूनिवर्स कंट्रोल आणि नवीन इमोजी देण्यात येतील. सध्या पब्लिक बीटा टेस्टमध्ये असलेला हा अपडेट मार्चमध्ये सर्व युजर्ससाठी उपलब्ध होऊ शकतो. परंतु अॅप्पलचे चाहते iPhone SE 3 5G ची सर्वाधिक वाट बघत आहेत.
iPhone SE 3 5G
iPhone SE 3 स्मार्टफोन 4.7-इंचाच्या डिस्प्लेसह बाजारात येईल. यात टच आयडी सेन्सर देण्यात येईल. काही रिपोर्ट्समध्ये यात फेस आयडीसह iPhone XR सारखी डिजाईन मिळणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर काही रिपोर्ट्स हा फोन A14 Bionic किंवा नव्या A15 Bionic चिपसेट आणि 5G कनेक्टिविटीसह सादर केला जाऊ शकतो, असं सांगत आहेत. जोपर्यंत फोन लाँच होत नाही तोपर्यंत हे स्पेक्स फक्त लिक्स म्हणता येतील.
iPad Air 2022
iPad Air 2022 मध्ये 10.9-इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. या टॅबलेटमध्ये A15 Bionic प्रोसेसर, 12MP अल्ट्रावाईड फ्रंट फेसिंग कॅमेरा आणि 5G सपोर्ट दिला जाऊ शकतो. हा टॅबलेट स्पेस ग्रे, सिल्वर ग्रीन, रोज गोल्ड आणि स्काय ब्लू कलरमध्ये सादर केला जाऊ शकतो.
हे देखील वाचा:
रियलमी सादर करणार सुंदर स्मार्टफोन; स्वस्त Realme C35 साठी फक्त एक आठवडा थांबा
यंदा राहू नका सिंगल! या डेटिंग अॅप्सच्या मदतीनं मिळवा Valentine’s Day 2022 च्या आधी डेट