स्वस्त iPhone आणि iPad लवकरच होणार भारतात लाँच; अँड्रॉइड युजर्स देखील करतील स्विच अशी किंमत  

By सिद्धेश जाधव | Published: February 2, 2022 04:13 PM2022-02-02T16:13:22+5:302022-02-02T16:13:59+5:30

Apple iPhone SE 3 iPad Air And iPad: लवकरच iPhone SE 3, नवीन iPad Air, आणि बजेट फ्रेंडली iPad मॉडेल देशात एंट्री करणार असल्याची माहिती आली आहे.

Apple iPhone SE 3 iPad Air And iPad To Be Launched In India Soon  | स्वस्त iPhone आणि iPad लवकरच होणार भारतात लाँच; अँड्रॉइड युजर्स देखील करतील स्विच अशी किंमत  

स्वस्त iPhone आणि iPad लवकरच होणार भारतात लाँच; अँड्रॉइड युजर्स देखील करतील स्विच अशी किंमत  

Next

Apple लवकरच भारतात एंट्री लेव्हल iPhone मॉडेल लाँच करू शकते. त्याचबरोबर कंपनी देशात iPad चे दोन नवीन मॉडेल देखील सादर करू शकते, अशी माहिती 91मोबाईल्सनं दिली आहे. रिपोर्टनुसार या डिवाइसेसची आयात सुरु झाली आहे. तसेच लवकरच iPhone SE 3, नवीन iPad Air, आणि बजेट फ्रेंडली iPad मॉडेल देशात एंट्री करणार असल्याची माहिती आली आहे.  

आगामी iPhone SE 3 आणि iPad ची संभाव्य किंमत  

रिपोर्टनुसार स्वस्त iPhone SE 3 भारतात मार्च किंवा एप्रिलमध्ये लाँच केला जाऊ शकतो. हा फोन A2595, A2783 आणि A2784 या मॉडेल नंबर्ससह आयात केला जात आहे. या फोनची किंमत 300 डॉलर्स (सुमारे 23,000 रुपये) रुपयांच्या आसपास असू शकते. परंतु याबाबत कंपनीनं मात्र अजूनही कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.  

कंपनीनं भारतात iPad Air चे A2588 आणि A2589 हे दोन मॉडेल भारतात आयात करत आहे. ज्यांची किंमत 500-700 डॉलर (सुमारे 37,500 ते 52,300 रुपये) पर्यंत असू शकते. तर बजेट आयपॅडची किंमत 300 डॉलर (सुमारे 23,000 रुपये) पर्यंत असू शकते. या बजेट फ्रेंडली अ‍ॅप्पल आयपॅडचे मॉडेल नंबर A2757 आणि A2761 आहेत. 

iPhone SE 3 चे स्पेक्स 

iPhone SE 3 स्मार्टफोन 4.7-इंचाच्या डिस्प्लेसह बाजारात येईल. यात टच आयडी सेन्सर देण्यात येईल. काही रिपोर्ट्समध्ये यात फेस आयडीसह iPhone XR सारखी डिजाईन मिळणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर काही रिपोर्ट्स हा फोन A14 Bionic किंवा नव्या A15 Bionic चिपसेट आणि 5G कनेक्टिविटीसह सादर केला जाऊ शकतो, असं सांगत आहेत. जोपर्यंत फोन लाँच होत नाही तोपर्यंत हे स्पेक्स फक्त लिक्स म्हणता येतील.  

हे देखील वाचा:

Web Title: Apple iPhone SE 3 iPad Air And iPad To Be Launched In India Soon 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.