Apple लवकरच स्वस्त आणि दमदार iPhone करणार सादर; 5G कनेक्टिव्हिटीसह होणार लाँच
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 07:36 PM2021-12-01T19:36:45+5:302021-12-01T19:36:59+5:30
Apple यावर्षीची फ्लॅगशिप सीरिज सादर केल्यानंतर आता स्वस्त आयफोनची तयारी करत आहे. हा फोन iPhone SE नावाने बाजारात येणार ...
Apple यावर्षीची फ्लॅगशिप सीरिज सादर केल्यानंतर आता स्वस्त आयफोनची तयारी करत आहे. हा फोन iPhone SE नावाने बाजारात येणार आहे. रिसर्च फर्म TrendForce ने आगामी iPhone SE ची लाँच टाइमलाईन सांगितली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, Apple iPhone SE 3 नावाचा स्वस्त फोन 2022 च्या दुसऱ्या तिमाहीत ग्राहकांच्या भेटीला येईल. रिसर्च फर्मनं हा अॅप्पलचा हा आगामी आयफोन 5G कनेक्टिव्हिटीसह मार्चमध्ये येईल, असं म्हटलं आहे.
Apple iPhone SE 3
Apple पुढीलवर्षी iPhone 14 लाईनअपमध्ये mini आयफोन सादर करणार नाही, त्याची जागा iPhone SE 3 घेईल,अशी माहिती काही रिपोर्ट्समधून मिळाली आहे. हा निर्णय iPhone Mini च्या कमी लोकप्रियतेमुळे घेतला जाऊ शकतो. त्यामुळेच या नव्या आयफोनमध्ये कंपनी कमी किंमतीत चांगले स्पेक्स आणि फीचर्स देऊ शकते, अशी चर्चा आहे.
आगामी iPhone SE 3 च्या डिजाइनमध्ये कंपनीनं कोणताही बदल केला नाही, असा दावा लोकप्रिय Apple अनॅलिस्ट मिंग-ची कू यांनी केला आहे. iPhone SE 3 मध्ये 4.7-इंचाचा रेटिना HD डिस्प्ले दिला जाऊ शकतो. यात होम बटनमध्ये Touch ID देण्यात येईल. अॅप्पलचा हा स्मार्टफोन लेटेस्ट A15 Bionic चिपसेटसह बाजारात येऊ शकतो.
iPhone SE Plus चे लीक स्पेक्स
iPhone SE Plus स्मार्टफोन 4.7 इंचाच्या एलसीडी डिस्प्लेसह सादर केला जाईल. यात A13 Bionic किंवा Apple A14 Bionic चिप मिळू शकते. फोनच्या मागे 12 मेगापिक्सलचा iSight सेन्सर दिला जाऊ शकतो. तसेच 7 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळू शकतो. यातील कॅमेरा सिस्टम सिक्स पोर्टेट लाईट इफेक्ट, ओआयएस आणि स्मार्ट HDR 3 सह सादर केली जाईल. हा फोन IP67 रेटिंग आणि डस्ट अँड वॉटर रेजिस्टन्ससह बाजारात येऊ शकतो. तसेच होम बटनमध्ये Touch ID मिळू शकते. ही लीक झालेली माहिती आहे, ठोस माहितीसाठी लाँचची वाट बघावी लागेल.