स्वस्त 5G Phone वर काम करतेय Apple; नव्या प्रोसेसरसह येणार किफायतशीर iPhone 

By सिद्धेश जाधव | Published: October 11, 2021 12:33 PM2021-10-11T12:33:41+5:302021-10-11T12:36:21+5:30

Cheap iPhone Apple iPhone SE 3 Specifications: Apple iPhone SE 3 चे काही स्पेसिफिकेशन्स हा फोन लाँच होण्याआधी समोर आले आहेत. हा फोन कंपनीचा सर्वात स्वस्त 5G फोन असू शकतो.

Apple iphone se 3 may get 5g connectivity and a15 bionic chipset  | स्वस्त 5G Phone वर काम करतेय Apple; नव्या प्रोसेसरसह येणार किफायतशीर iPhone 

प्रतीकात्मक फोटो.

Next

अ‍ॅप्पलने गेल्या महिन्यात आपली iPhone 13 सीरीज लाँच केली आहे. ही कंपनीची फ्लॅगशिप सीरिज आहे, जिची किंमत जास्त असते. परंतु अ‍ॅप्पलचे चाहते आता एसई सीरिजची वाट बघत आहेत. कारण ही कंपनीची स्वस्त सीरिज आहे. या सीरिजमध्ये कंपनी यावर्षी Apple iPhone SE 3 लाँच करणार आहे. या फोनची माहिती अनेक लिक्स आणि रिपोर्ट्समधून समोर आली आहे.  

iPhone SE 3 चे कॉन्सेप्ट रेंडर काही दिवसांपूर्वी लीक झाला होते. या लीकनुसार हा फोन डिजाईनच्या बाबतीत जुन्या iPhone SE 2020 सारखा असेल. परंतु Macotakara ने दिलेल्या माहितीनुसार कंपनी हा फोन कनेक्टिविटी आणि स्पेसिफिकेशन्सच्या बाबतीत अपग्रेड करण्यात येईल.  

रिपोर्ट्सनुसार, आगामी Apple iPhone SE 3 मध्ये 5G कनेक्टिविटी मिळू शकते. 5G कनेक्टिव्हिटी असलेला हा पहिला iPhone SE फोन असेल. या फोनची परफॉर्मन्स सुधारण्यासाठी कंपनी यात A15 Bionic चिपसेट देऊ शकते. हा चिपसेट कंपनीने नुकत्याच लाँच झालेल्या iPhone 13 series मध्ये देखील वापरला आहे. त्याचबरोबर नेटवर्क बूस्टसाठी डिवाइसमध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन X60 5G मॉडेम देण्यात येईल.  

इतर स्पेक्स पाहता हा फोन फिजिकल सिम आणि eSIM सपोर्टसह सादर केला जाऊ शकतो. यात 4.7-इंचाचा डिस्प्ले असेल. तसेच फ्रंट पॅनलवरील होम बटन टचआयडी सेन्सरचे देखील काम करेल. याव्यतिरिक्त इतर कोणतीही माहिती अजूनतरी समोर आलेली नाही. तसेच कंपनी हा फोन कधी सादर करेल हे देखील समजले नाही.  

Web Title: Apple iphone se 3 may get 5g connectivity and a15 bionic chipset 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.