2022 मध्ये येणार स्वस्त iPhone SE Plus, परंतु iPhone SE3 चा लाँच लांबणीवर 

By सिद्धेश जाधव | Published: October 26, 2021 07:30 PM2021-10-26T19:30:49+5:302021-10-26T19:31:00+5:30

Apple iPhone SE 2022 Launch: Apple आपल्या आयफोन एसई लाईनअपमधील iPhone SE Plus स्मार्टफोन पुढील वर्षी लाँच करू शकते.  

Apple Iphone se plus 5g may launch next year 2022 iphone se 3 is now pushed to 2024 specification leak details  | 2022 मध्ये येणार स्वस्त iPhone SE Plus, परंतु iPhone SE3 चा लाँच लांबणीवर 

2022 मध्ये येणार स्वस्त iPhone SE Plus, परंतु iPhone SE3 चा लाँच लांबणीवर 

googlenewsNext

अ‍ॅप्पल आपल्या iPhone SE सीरीजमध्ये नवीन फोन यावर्षी लाँच करणार आहे, अशा बातम्या याआधी आल्या होत्या. परंतु आता समोर आलेल्या लीकनुसार हा लाँच पुढील वर्षी 2022 वर ढकलण्यात आला आहे. पुढीलवर्षी 5G कनेक्टिव्हिटीसह iPhone SE Plus लाँच केला जाऊ शकतो. याआधी या फोनची माहिती लीक झाली होती.  

आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार आयफोन एसई प्लस स्मार्टफोन 499 डॉलर्समध्ये लाँच केला जाऊ शकतो. ही किंमत जवळपास 36,300 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. तसेच हा फोन 6.1 इंचाच्या डिस्प्लेसह बाजारात येईल. परंतु लेकिन लेटेस्ट लीकमध्ये सांगण्यात आले आहे कि, 2022 मध्ये येणार हा फोन 4.7 इंचाच्या एलसीडी डिस्प्लेसह सादर केला जाईल.  

टिप्सटर Ross Young ने iPhone SE Plus ची लेटेस्ट माहिती दिली आहे. त्यानुसार हा फोन 4.7 इंच एलसीडी डिस्प्ले आणि 5जी सपोर्टसह 2022 मध्ये बाजारात येईल. तसेच 5.7 इंच आणि 6.1 इंच एलसीडी डिस्प्ले असलेला iPhone SE3 स्मार्टफोनसाठी 2024 ची वाट बघावी लागू शकते.  

iPhone SE Plus चे लीक स्पेक्स   

iPhone SE Plus स्मार्टफोन 4.7 इंचाच्या एलसीडी डिस्प्लेसह सादर केला जाईल. यात A13 Bionic किंवा Apple A14 Bionic चिप मिळू शकते. फोनच्या मागे 12 मेगापिक्सलचा iSight सेन्सर दिला जाऊ शकतो. तसेच 7 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळू शकतो. यातील कॅमेरा सिस्टम सिक्स पोर्टेट लाईट इफेक्ट, ओआयएस आणि स्मार्ट HDR 3 सह सादर केली जाईल. हा फोन IP67 रेटिंग आणि डस्ट अँड वॉटर रेजिस्टन्ससह बाजारात येऊ शकतो. तसेच होम बटनमध्ये Touch ID मिळू शकते. ही लीक झालेली माहिती आहे, ठोस माहितीसाठी लाँचची वाट बघावी लागेल.  

Web Title: Apple Iphone se plus 5g may launch next year 2022 iphone se 3 is now pushed to 2024 specification leak details 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.