अॅपलनं iPhone XS, XS Max आणि XR केले लाँच
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2018 12:07 AM2018-09-13T00:07:19+5:302018-09-13T00:08:59+5:30
अॅपलनं दरवर्षीप्रमाणे यंदाही सॅन फ्रान्सिस्कोमधील कंपनीच्या मुख्यालयात आज रात्री एक इव्हेंट आयोजित केला आहे.
सॅन फ्रान्सिस्को- अॅपलनं दरवर्षीप्रमाणे यंदाही सॅन फ्रान्सिस्कोमधील कंपनीच्या मुख्यालयात आज रात्री एक इव्हेंट आयोजित केला आहे. या इव्हेंटमध्ये अॅपलनं iPhone XS, XS Max आणि XR हे फोन लाँच केले आहेत. त्यातील दोन फोनमध्ये ड्युअल सिमचा पर्यायही उपलब्ध करून दिला आहे. अॅपलचे सीईओ टीम कुक यांच्या हस्ते या फोन्सचं अनावरण करण्यात आलं. अॅपलनं लाँच केलेल्या फोन्समध्ये अॅपल वॉचसह तीन विशेष फीचर्स दिले आहेत. लाँच करण्यात आलेल्या फोनमध्ये लो हार्ट रेट, हार्ट रिदम, ईसीजी अशी तीन प्रकारची वैशिष्ट्यपूर्ण फीचर्स देण्यात आली आहेत. या वेळी अॅपलनं तीन आयफोन, मॅकबुक एअर-2, अॅपल वॉच-4, एअरपॉड-2, फेस-आयडी आयपॅड लॉन्च केले आहेत.
#AppleEvent #iPhone7#iPhone8#iPhoneX#iPhoneXS#iPhoneXSMax #iPhoneXR prices Yea...that is all from Apple . All phones have #iOS12pic.twitter.com/QNrx5GIjaO
— SMART TOUCH ID🎙📱 (@SmartTouchID) September 12, 2018
सीईओ टीम कुक म्हणाले, जगभरात आतापर्यंत 2 अब्ज आयओएस डिव्हाइस आहेत. या डिव्हाइसमुळे जगण्याचा अंदाजच बदलून गेला आहे. त्यांनी सर्वात आधी अॅपल वॉच- 4 सीरिज लाँच केलं आहे. ज्याची किंमत 399 डॉलरपासून सुरू होते. अॅपल वॉच-4ची विक्री 14 सप्टेंबरपासून 16 देशांमध्ये सुरू होणार आहे. परंतु या 16 देशांच्या यादीत भारताचं नाव नाही आहे.
Here is the Apple Watch Series 4, in either 40mm or 44mm case sizes, and with a more than 30% larger screen compared to Series 3. #AppleEventpic.twitter.com/4YKigcgSKw
— Andy Boxall (@AndyBoxall) September 12, 2018
विशेष म्हणजे अॅपल वॉच 4 ची स्क्रीन आधीच्या वॉचच्या तुलनेत 30 टक्क्यांनी वाढवली आहे. तसेच त्याची किंमत 399 डॉलर(28 हजार 700), 499 डॉलर (35 हजार 900) अशी असणार आहे. या वॉचमध्ये जबरदस्त बॅटरी बॅकअपही देण्यात आला आहे. तुम्ही एकदा वॉच पूर्ण चार्ज केल्यानंतर तुम्हाला जवळपास 18 तास ते चार्ज करावं लागणार नाही.
Notes from @Apple
— Oliver Maroney (@OMaroneyNBA) September 12, 2018
iPhone XS: 30 more minutes of battery life (X), dual-sim (ESim) capable
iPhone XS Max: 1.5 hours more battery life (X), dual-sim (ESim) capable
iPhone XR: 1.5 hours more battery life (8-Plus)
Used with 30% recycled materials, according to the #AppleEvent pic.twitter.com/WkziONsQ6Z
अॅपलनं लाँच केलेल्या फोनमध्ये हटके फीचर्स आहेत. या फोन्सला अनुक्रमे 5.8 इंच आणि 6.5 इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे. तसेच इंटर्नल स्टोरेज 512 जीबीपर्यंत उपलब्ध करून दिला आहे. या नव्या आयफोनमधल्या कॅमे-याची क्लिअॅरिटीही जबरदस्त आहे. आयफोन XSमध्ये 6 कोअरचा प्रोसेसर बसवण्यात आला आहे. त्यामुळे त्याचा स्पीड इतर फोन्सच्या तुलनेत दुप्पटीनं वाढला आहे. तसेच आयफोन XS मॅक्स हा जगातील सर्वात वेगवान फोन असल्याचा दावाही कंपनीनं केला आहे.
iPhone Xs Max:
— Product Hunt (@ProductHunt) September 12, 2018
6.5" Super Retina screen
OLED Display
2688 x 1242
3.3M pixels
458 ppi
Just gorgeous. #AppleEventpic.twitter.com/FUGGJzoSr6