Apple Event: फक्त स्वस्त 5G iPhone नव्हे तर ‘हे’ डिवाइसेज देखील येणार पुढील आठवड्यात ग्राहकांच्या भेटीला 

By सिद्धेश जाधव | Published: March 3, 2022 12:45 PM2022-03-03T12:45:44+5:302022-03-03T12:45:52+5:30

Apple March 8 Event: मार्चच्या या इव्हेंटमधून कंपनीनं iPhone SE 3 किंवा iPhone SE 5G सह अन्य काही डिवाइसेज देखील सादर करू शकते.  

Apple march 8 event is official now iphone se 5g new ipad air new mac mini with m1 pro chip could launch  | Apple Event: फक्त स्वस्त 5G iPhone नव्हे तर ‘हे’ डिवाइसेज देखील येणार पुढील आठवड्यात ग्राहकांच्या भेटीला 

Apple Event: फक्त स्वस्त 5G iPhone नव्हे तर ‘हे’ डिवाइसेज देखील येणार पुढील आठवड्यात ग्राहकांच्या भेटीला 

Next

Apple नं March 8 Event 2022 चा काऊंटडाऊन टायमर आपल्या वेबसाईटवर सेट केला आहे. या खास इव्हेंटमधून iPhone SE 3 किंवा iPhone SE 5G लाँच केला जाईल. तसेच सोबत अन्य डिवाइसेज देखील ग्राहकांच्या भेटीला येऊ शकतात. Peek Performance नावाच्या या इव्हेंटमधून सादर होणाऱ्या डिवाइसेजची माहिती कंपनीनं मात्र दिली नाही.  

iPhone SE 5G 

गेले कित्येक दिवस Apple iPhone SE 5G ची माहिती येत आहे. काही लिक्समध्ये याचा उल्लेख iPhone SE 3 आणि iPhone SE 2022 असा देखील करण्यात आला आहे. हा जुन्या iPhone SE 2020 च्या डिजाईनवर सादर केला जाईल. ज्यात 4.7 इंचाचा डिस्प्ले आणि Touch ID मिळू शकते. या फोनच्या बॅक आणि फ्रंटला 12MP चा कॅमेरा मिळेल. लेटेस्ट A15 Bionic चिपसेटसह येणारा हा फोन आता पर्यंतचा सर्वात स्वस्त iPhone असेल. याची किंमत 25,000 रुपयांच्या आसपास असू शकते.  

अन्य डिवाइसेज  

या इव्हेंटमधून iPad Air (iPad Air 2022) देखील सादर केला जाऊ शकतो. जो 5G कनेक्टिविटी असलेल्या नवीन चिपसेटसह बाजारात येईल. तसेच, यात FaceTime साठी कॅमेरा आणि सेंटर स्टेज सारखे फीचर्स मिळतील. March 8 Event मधून नवीन Mac Mini लाँच होऊ शकतो. यात फास्ट M1 Pro आणि M1 Max चिपचा वापर केला जाऊ शकतो. तसेच M2 चिपची घोषणा देखील करू शकते. 

हे देखील वाचा:

Web Title: Apple march 8 event is official now iphone se 5g new ipad air new mac mini with m1 pro chip could launch 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.