Apple आणि Meta वर ठोठावला 6823 कोटींचा दंड; कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 20:59 IST2025-04-23T20:58:16+5:302025-04-23T20:59:20+5:30
Apple Meta Fine: दोन्ही कंपन्यांनी या दंडाविरोधात आव्हान देणार असल्याचे म्हटले आहे.

Apple आणि Meta वर ठोठावला 6823 कोटींचा दंड; कारण काय?
Apple Meta Fine: युरोपियन युनियनने अॅपल आणि मेटावर मोठा दंड ठोठावला आहे. दोन्ही कंपन्यांना 70 कोटी युरो (सुमारे 6,823 कोटी रुपये) दंड ठोठावला आहे. यातील अॅपलवर 50 कोटी युरो (सुमारे 4,874 कोटी रुपये) अन् मेटावर 20 कोटी युरो (सुमारे 1949 कोटी रुपये) दंड ठोठावण्यात आला आहे.
का ठोठावला दंड?
हा दंड युरोपियन युनियन अँटीट्रस्ट रेग्युलेटरने लावला आहे. टेक कंपन्यांचे पंख छाटण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल मानले जात आहे. युरोपियन युनियनने ठोठावलेल्या दंडानंतर अमेरिका आणि युरोपमधील संबंधांवरही परिणाम होऊ शकतो. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच अमेरिकन कंपन्यांवर दंड आकारणाऱ्या देशांवर कर लादण्याची धमकी दिली आहे.
अॅपल काय म्हणते?
हा दंड डिजिटल मार्केट कायद्याअंतर्गत ठोठावण्यात आला आहे. हा कायदा बाजारात मोठ्या कंपन्यांच्या वर्चस्वात लहान कंपन्याचा प्रवेश सुनिश्चित करतो. दरम्यान, या दंडाविरोधात अॅपल कोर्टाचे दरवाजे ठोठावणार आहे.
मेटाने काय म्हटले?
मेटानेही युरोपियन युनियनच्या निर्णयावर टीका केली आहे. कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, युरोपियन कमिशन यशस्वी अमेरिकन व्यवसायांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे, तर चिनी आणि युरोपियन कंपन्यांना वेगवेगळ्या मानकांनुसार काम करण्याची परवानगी दिली जात आहे.