भारतात Apple Online Store; 'ट्रेड इन प्रोग्रॉम'पासून ऑफर्सपर्यंत सर्वकाही, जाणून घ्या... 

By ravalnath.patil | Published: September 23, 2020 12:54 PM2020-09-23T12:54:22+5:302020-09-23T13:24:36+5:30

यामध्ये iPhone, Mac, iPad, Apple Watch, AirPods, iPod touch, Apple TV आणि Accessories चा समावेश आहे.

apple online store is now live in india everything you should know | भारतात Apple Online Store; 'ट्रेड इन प्रोग्रॉम'पासून ऑफर्सपर्यंत सर्वकाही, जाणून घ्या... 

भारतात Apple Online Store; 'ट्रेड इन प्रोग्रॉम'पासून ऑफर्सपर्यंत सर्वकाही, जाणून घ्या... 

Next

अमेरिकेतील टेक कंपनी अ‍ॅपलने भारतात पहिले ऑनलाइन स्टोअर सुरू केले आहे. यासाठी तुम्हाला अ‍ॅपल कंपनीच्या वेबसाइटवर जावे लागणार आहे. वेबसाइटवरील होम पेजवरूनच अ‍ॅपल ऑनलाइन स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही प्रोडक्ट्स खरेदी करू शकता.

अ‍ॅपल ऑनलाइन स्टोअरसाठी https://www.apple.com/in/shop ही लिंक आहे. याद्वारे तुम्ही थेट अ‍ॅपलच्या प्रोडक्ट्सच्या पेजवर जाऊन खरेदी करू शकता. तसेच, Apple India Online Store वर एकूण नऊ कॅटगरी दिसत आहेत. यामध्ये iPhone, Mac, iPad, Apple Watch, AirPods, iPod touch, Apple TV आणि Accessories चा समावेश आहे.

ऑनलाइन अ‍ॅपल स्टोअरचे फायदे -

ट्रेड इन प्रोग्रॉम
अ‍ॅपल ट्रेड इम प्रोग्रॉम अंतर्गत जुना योग्य स्मार्टफोनला एक्सचेंज करून आयफोनवर डिस्काउंट मिळवू शकता. यासाठी योग्य अशा स्मार्टफोनची लिस्ट देण्यात आली आहे. त्यानुसार तुम्ही स्मार्टफोन एक्सचेंज करू शकता. उदा. Galaxy S10 एक्सचेंज केल्यानंतर आपल्याला 23,020 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.

अ‍ॅपल केअर प्लस  (Apple Care+)
अ‍ॅपल केअर प्लस अंतर्गत आता अ‍ॅपल प्रोडक्ट्सवर दोन वर्षांसाठी टेक्निकल सपोर्ट आणि अ‍ॅक्सिडेंटल डॅमेज कव्हरसाठी वॉरंटी अ‍ॅक्स्टेंड करू शकता.

कस्टमायजेशन ऑप्शन
मॅक कॅम्युटर्सला तुम्ही आपल्या आवश्यकतेनुसार कस्टमाइज करू शकता. म्हणजे मेमरी किंवा रॅमबीबत निर्णय घेऊ शकता. अतिरिक्त ग्राफिक्स कार्ड देखील अ‍ॅड करू शकता.

डिव्हाइसच्या माहितीसाठी फ्री सेशन
याअंतर्गत तुम्ही अ‍ॅपल स्पेशालिस्टसोबत फ्री सेशन शेड्युल करू शकता. त्यानुसार तुम्हाला डिव्हाइसबद्दल सविस्तर माहिती दिली जाईल.

खरेदीवेळी स्पेशालिस्टसोबत चर्चा
अ‍ॅपलच्या वेबसाइटवर खरेदी करताना तुम्ही आपल्या भाषेत स्पेशालिस्टसोबत चर्चा करून सल्ला घेऊ शकता.

मॉडिफिकेशन
Apple AirPods  या अ‍ॅपल पेन्सिलवर टेक्स्ट एन्ग्रेव्ह करू शकता. आपल्या आवडीचे इमोजी देखील नवीन एअरपॉडवर तयार करू शकता. यापूर्वी हा पर्याय भारतात उपलब्ध नव्हता.

खरेदीचे ऑप्शन
अ‍ॅपल ऑनलाइन स्टोअरमध्ये तुम्हाला बर्‍याच प्रकारचे खरेदीचे ऑप्शन मिळतील. यामध्ये EMI सह डेबिट आणि क्रेडिट कार्डचा ऑप्शन देण्यात आला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, नेट बँकिंग आणि क्रेडिट कार्ड ऑन  डिलिव्हरीचा ऑप्शनही देण्यात येणार आहे. मात्र, कॅश ऑन डिलिव्हरी नाही आहे.

स्टुडंट्स डिस्काउंट
अ‍ॅपल ऑनलाइन स्टोअरमधून स्टुडंट्स प्रोडक्ट्सवर डिस्काउंट मिळवू शकता. प्रोडक्ट्स खरेदी करताना तुम्ही एखाद्याला गिफ्ट मेसेज सुद्धा पाठवू शकता. येथे तुम्हाला मेसेज लिहिण्याचा ऑप्शन मिळेल. तेथून तुम्ही लिहून प्रोडक्ट्स खरेदी करू शकता.

आणखी बातम्या..

 बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांची स्वेच्छानिवृत्ती; निवडणुकीच्या रिंगणात उतरणार?

- PM Kisan Scheme : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले ९३ हजार कोटी; अशाप्रकारे करू शकता अर्ज  

- मानलं गड्या! नोकरीसाठी ६० वर्षांच्या माजी सीईओंनी मारले पुशअप्स; पाहा फोटो    

- मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी खूशखबर, आता सहा नाही तर दहा हजार मिळणार सन्मान निधी    

-  Mumbai Rains: अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये, आस्थापने बंद; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन

Web Title: apple online store is now live in india everything you should know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.