Apple Event मध्ये आज लॉन्च होणार सर्वात स्वस्त iPhone; इथे बघा लाईव्ह इव्हेंट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 07:42 PM2022-03-08T19:42:22+5:302022-03-08T19:42:32+5:30
आज होणाऱ्या Apple इव्हेंटमध्ये कंपनी iPhone SE 3 आणि नवीन Macs सह अनेक प्रोडक्ट लॉन्च करू शकते. हा इव्हेंट तुम्ही घरबसल्या लाईव्ह बघू शकता.
Apple नं आज म्हणजे 8 मार्चला एका इव्हेंटचं आयोजन केलं आहे. यातून iPhone SE 3, नवीन iPad Air आणि नवीन सिलिकॉन असलेलं Macs लॉन्च होणार आहेत. कंपनीच्या या इव्हेंटमधून एकापेक्षा एक चांगले प्रोडक्ट लाँच करू शकते. हा इव्हेंट तुम्ही तुमच्या घरातूनच लाईव्ह बघू शकता.
Apple Event Schedule
Apple Peek Performance Event भारतीय वेळेनुसार आज रात्री 11:30 वाजता सुरु होईल. कंपनीचा हा इव्हेंट Apple March 8th Event च्या नावानं देखील ओळखला जात आहे. हा इव्हेंट कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून थेट प्रक्षेपित केला जाईल. तसेच YouTube चॅनल आणि Apple TV वरून देखील हा इव्हेंट बघता येईल.
स्वस्त iPhone येणार ग्राहकांच्या भेटीला
गेले कित्येक दिवस Apple iPhone SE 5G ची माहिती येत आहे. काही लिक्समध्ये याचा उल्लेख iPhone SE 3 आणि iPhone SE 2022 असा देखील करण्यात आला आहे. हा जुन्या iPhone SE 2020 च्या डिजाईनवर सादर केला जाईल. ज्यात 4.7 इंचाचा डिस्प्ले आणि Touch ID मिळू शकते. या फोनच्या बॅक आणि फ्रंटला 12MP चा कॅमेरा मिळेल. लेटेस्ट A15 Bionic चिपसेटसह येणारा हा फोन आता पर्यंतचा सर्वात स्वस्त iPhone असेल. याची किंमत 25,000 रुपयांच्या आसपास असू शकते.
iPad आणि मॅक देखील होणार लाँच
या इव्हेंटमधून iPad Air (iPad Air 2022) देखील सादर केला जाऊ शकतो. जो 5G कनेक्टिविटी असलेल्या नवीन चिपसेटसह बाजारात येईल. तसेच, यात FaceTime साठी कॅमेरा आणि सेंटर स्टेज सारखे फीचर्स मिळतील. March 8 Event मधून नवीन Mac Mini लाँच होऊ शकतो. यात फास्ट M1 Pro आणि M1 Max चिपचा वापर केला जाऊ शकतो. तसेच M2 चिपची घोषणा देखील करू शकते.