Iphone च्या नव्या अपेडटमध्ये फोन हॅक होऊ शकणारे 'सिक्युरिटी बग्स' केले फिक्स; लगेच अपेडट करा
By जयदीप दाभोळकर | Published: January 27, 2021 06:34 PM2021-01-27T18:34:49+5:302021-01-27T18:37:54+5:30
सफारी वेब ब्राऊझरमध्ये सापडले होते दोन बग्स
Apple iOS 14.4 Update: Apple नं आयफोन, आयपॅडसाठी iOS 14.4 हे अपडेट जारी केलं आहे. याव्यतिरिक्त कंपनीनं HomePod साठीही अपडेट जारी केलंय. याव्यतिरिक्त Apple नं कंपनी ने watchOS 7.3 आणि Black Unity Watch Series 6 जारी केलं असून ब्लॅक युनिटी वॉच फेसचा शेप संपूर्ण दिवस बदलत राहतो आणि प्रत्येक युझरसाठी एक अनोखा फेस तयार होता. दरम्यान, या अपडेटमध्ये Apple नं काही सिक्युरिटी बग्स फिक्स केले आहेत. त्यामुळे हे अपडेट त्वरित डाऊनलोड करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
नवी अपडेट iPhone 6s, iPad Air 2, iPad mini 4, iPod touch (7th जनरेशन) आणि त्यानंतरच्या डिव्हाईससाठी उपलब्ध आहे. कंपनीला Safari ब्राउझर च्या WebKit मध्ये दोन बग सापडले होते. बग ठिक करण्यासोबतच नव्या अपडेटच्या मदतीनं कॅमेऱ्याद्वारे आता छोटा क्युआर कोडही ओळखता येणार आहे. तसंच सेटिंग्समध्ये ब्लुटूथ डिव्हाईस टाईप क्लासिफाय करण्यासही मदत मिळणार आहे. याव्यतिरिक्त नव्या अपडेमुळे iPhone 12 सीरिजच्या फोनमध्ये कॅमेरा नव्या आणि योग्य पद्धतीनं काम करतोय का नाही याचीदेखील माहिती मिळणार आहे.
iPhone 12 Pro चा वापर करणाऱ्या युझर्सना HDR फोटो घेताना येत असलेल्या समस्याही सोडवण्यात आल्या आहेत. तसंच टायपिंग करताना होणारा उशीर आणि कीबोर्डमध्येही काही बदल करण्यात आले आहे. याशिवाय watchOS 7.3 देखील काही बग्स ठिक करण्यात आले आहेत.