म्हणूनच अ‍ॅप्पल नंबर वन! फोनच्या बॉक्समध्ये छोटासा बदल करून वाचवले 50 हजार कोटी रुपये 

By सिद्धेश जाधव | Published: March 15, 2022 12:48 PM2022-03-15T12:48:59+5:302022-03-16T13:24:50+5:30

Apple नं आपल्या आयफोनच्या बॉक्समध्ये छोटासा बदल करून 50 हजार कोटींची बचत केली आहे. तसेच कोट्यवधींची कमाई देखील केली आहे.  

Apple Reportedly Saved Around Rs 50000 Crore By Removing Charger From iPhone Box  | म्हणूनच अ‍ॅप्पल नंबर वन! फोनच्या बॉक्समध्ये छोटासा बदल करून वाचवले 50 हजार कोटी रुपये 

म्हणूनच अ‍ॅप्पल नंबर वन! फोनच्या बॉक्समध्ये छोटासा बदल करून वाचवले 50 हजार कोटी रुपये 

Next

Apple नं 2020 मध्ये आपल्या iPhone 12 सीरिजची घोषणा केली होती. तेव्हा या स्मार्टफोनच्या घोषणेपेक्षा कंपनीच्या एका निर्णयाची सर्वात जास्त चर्चा झाली ती म्हणजे, कंपनीनं फोनच्या बॉक्समध्ये चार्जर आणि ईयरपॉड्स देणं बंद केलं होतं. तसेच ज्या युजर्सना चार्जर किंवा ईयरपॉड्स हवे असल्यास त्यांना ते स्वतःहून वेगेळे खरेदी करावे लागतील.  

कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी कंपनीनं बॉक्समध्ये अ‍ॅक्सेसरीज देण्याचं बंद केलं आहे, असं कंपनीनं सांगितलं आहे. या निर्णयाचा अ‍ॅप्पलला फायदा झाला हे निश्चित. आता एका रिपोर्टनुसार, आयफोनच्या बॉक्समधून चार्जर आणि ईयरपॉड्स काढून अ‍ॅप्पलनं मोठी बचत केली आहे, जी 50,000 कोटी रुपयांच्या आसपास आहे.  

शिपमेंटची खर्च देखील झाला कमी 

अ‍ॅप्पलनं iPhone 12 पासून आयफोन्सच्या बॉक्समध्ये अ‍ॅक्सेसरीज देत नाही परंतु स्मार्टफोनची किंमत मात्र कमी केली नाही. त्यामुळे अ‍ॅप्पल प्रत्येक डिवाइसवर 27 पाउंड अर्थात सुमारे 2,500 रुपये वाचवत आहे. तसेच बॉक्सचा आकार कमी झाल्यामुळे शिपमेंट कॉस्ट देखील कमी झाली आहे. Apple तेवढ्याच जागेत 70 टक्के जास्त डिवाइस शिप करू शकते. Daily Mail नुसार, 2020 पासून अ‍ॅप्पलची शिपमेंट कॉस्ट 40 टक्क्यांनी कमी झाली आहे.  

2020 पासून अ‍ॅप्पलनं 190 मिलियन आयफोन विकले आहेत. चार्जर, ईयरफोन आणि शिपिंग कॉस्ट जोडल्यास अ‍ॅप्पलची 5 बिलियन पाउंडची बचत झाली असू शकते. ही रक्कम सुमारे 50,000 कोटी भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. तसेच या अ‍ॅक्सेसरीजची स्वतंत्रपणे विक्री करून कंपनीनं कमावलेल्या पैशांचा हिशोब मात्र यात जोडलेला नाही.  

हे देखील वाचा:

Web Title: Apple Reportedly Saved Around Rs 50000 Crore By Removing Charger From iPhone Box 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.