कर्मचाऱ्यांची दिवाळी! वर्क फ्रॉम होमसाठी ‘ही’ कंपनी देतेय १००० डॉलर्सचा बोनस; मुदतही मागे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 08:11 PM2021-12-16T20:11:20+5:302021-12-16T20:12:42+5:30
एका बड्या कंपनीने कर्मचाऱ्यांना दिलेली वर्क फ्रॉम होमची मुदत मागे घेतली आहे. पाहा, डिटेल्स...
वॉशिंग्टन: कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटनंतर आता ओमायक्रॉन व्हेरिएंटने जगाची चिंता वाढवली आहे. त्यामुळे जागतिक स्तरावरील अनेकविध कंपन्या कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये येणे बंधनकारक करण्यावर फेरविचार करत आहे. यातच जगातील प्रमुख कंपन्यांमध्ये आघाडीवर असलेल्या एका बड्या कंपनीने कर्मचाऱ्यांची वर्क फ्रॉम होमची मुदत मागे घेतली आहे. एवढेच नव्हे तर कंपनीकडून १००० डॉलर्सचा बोनसही जाहीर केला आहे.
ही बडी कंपनी दुसरी, तिसरी कोणतीही नसून, अॅप्पल कंपनी आहे. अॅप्पलचे सीईओ टिम कुक यांनी आधी सांगितले होते की, ऑक्टोबरमध्ये कर्मचार्यांसाठी कार्यालय उघडले जाईल. नंतर १ फेब्रुवारी २०२२ पर्यंत वाढविण्यात आला होता. कंपनीने आठवडाभरापूर्वी कर्मचाऱ्यांना फेब्रुवारीपर्यंत कामावर येण्यास सांगितले होते. मात्र पुन्हा एकदा ही मुदत वाढवण्यात आली आहे.
अॅप्पलने स्टोअरमध्ये आता मास्क अनिवार्य
कोरोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर अॅप्पलने तीन रिटेल स्टोअर्समधील काम बंद केले आहे. अॅप्पलने त्यांच्या यूएस स्टोअरमध्ये आता मास्क अनिवार्य केले आहे. यापूर्वी ग्राहकांसाठी मास्क घालण्याचा आदेश काढून घेण्यात आला होता. मात्र, आता पुन्हा हा नियम लागू केला आहे. एका अहवालानुसार, अमेरिकेतील जवळजवळ अर्ध्या अॅप्पल स्टोअरमध्ये ग्राहकांना मास्क घालण्याची आवश्यकता नव्हती. दुसरीकडे, अॅप्पलने म्हटले आहे की, ग्राहक आणि कर्मचार्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मास्क अनिवार्य आहे.
दरम्यान, गतवर्षात कोरोना उद्रेक झाल्यानंतर अॅप्पलने आपल्या कर्मचार्यांना घरी राहण्याचा सल्ला दिला होता. तसेच पहिली यूएस कंपनी ठरली होती. तसेच यावर्षीच्या सप्टेंबर महिन्यात कार्यालय सुरू करण्याच्या तयारीत होते. त्यानंतर, कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता कालावधी एक महिना म्हणजे ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आला. त्यानंतर हीच तारीख फेब्रुवारी २०२२ पर्यंत योजना बदलण्यात आली आणि आता त्यात पुन्हा एकदा बदल करण्यात आला आहे. टेक दिग्गज मायक्रोसॉफ्ट कॉर्पने सप्टेंबरमध्ये कामावर परतण्याची तारीख रद्द केली होती.