समारंभात मिरवण्यापुरता भाड्यानं घेता येणार iPhone, ईएमआयपेक्षा स्वस्त असू शकते Apple ची सेवा
By सिद्धेश जाधव | Published: March 25, 2022 03:21 PM2022-03-25T15:21:04+5:302022-03-25T15:21:39+5:30
अॅप्पलचे हार्डवेयर प्रोडक्ट्स लवकरच भाड्यानं घेता येतील. सध्या कंपनी आपल्या या सेवेची चाचणी करत आहे.
Apple लवकरच हार्डवेयर प्रोडक्ट्ससाठी सब्सक्रिप्शन सेवा सुरु करू शकते. या सेवेमुळे आयफोन, आइपॅडसह अन्य डिवाइस भाड्यानं घेता येतील. रिपोर्टनुसार, युजर्स एका अॅपमधून मासिक हप्ता देऊन अॅप्पलचे हार्डवेयर प्रोडक्ट्स घेऊ शकतील. सध्या कंपनी या सेवेची चाचणी करत आहे आणि यावर्षीच्या अखेरपर्यंत किंवा पुढील वर्षी ही सेवा सर्वांच्या भेटीला येईल.
Bloomberg च्या रिपोर्टनुसार, अॅप्पल जसं सॉफ्टवेयरचं सब्सक्रिप्शन देते तसं आता हार्डवेयर प्रोडक्ट्स देखील सब्सक्रिप्शनवर विकू शकते. कंपनीचा सब्सक्रिप्शन सर्व्हिसवर विश्वास आहे म्हणून Apple Music, iCloud, Apple TV Plus, Apple Fitness Plus आणि Apple Arcade सारख्या सेवांसाठी मंथली सब्सक्रिप्शन घ्यावं लागतं. हा अॅप्पलच्या कमाईचा एक मार्ग आहे.
अॅप्पल आपले प्रोडक्ट ईएमआयवर देखील विकते परंतु नवीन सेवा तशी नसेल. हार्डवेयर सर्व्हिसची सब्सक्रिप्शन फी प्रोडक्टच्या ईएमआय इतकी नसेल. ईएमआयमध्ये युजरला एक ते दोन वर्षात सर्व किंमत द्यावी लागते. तसेच कंपनी हार्डवेयर सोबत सॉफ्टवेयर सेवा देखील एकाच सब्सक्रिप्शनमध्ये देऊ शकते. या नव्या सेवेत नवीन डिवाइसवर अपग्रेड करण्याचा पर्याय मिळेल की नाही याची माहिती मिळाली नाही.
कंपनीच्या इतिहासात प्रथमच डिवाइस लीजवर देण्याची सब्सक्रिप्शन सेवा अॅप्पल सादर करू शकते. यामुळे ग्राहकांना परवडणाऱ्या किंमतीत आयफोन, मॅकबुक, आयपॅड इत्यादी महागडे डिवाइस वापरता येऊ शकतील. तसेच कंपनीला देखील कमाईचा एक नवा मार्ग मिळेल.