Apple भारतात आणखी नवीन चार स्टोअर उघडणार; टिम कुक यांनी केले कन्फर्म , AI फिचरही येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 20:29 IST2025-01-31T20:23:52+5:302025-01-31T20:29:17+5:30

Apple Store : भारतात ॲपल आणखी चार नवीन रिटेल स्टोअर उघडणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Apple to open four more new stores in India Tim Cook confirms, AI feature will also come | Apple भारतात आणखी नवीन चार स्टोअर उघडणार; टिम कुक यांनी केले कन्फर्म , AI फिचरही येणार

Apple भारतात आणखी नवीन चार स्टोअर उघडणार; टिम कुक यांनी केले कन्फर्म , AI फिचरही येणार

Apple Store : ॲपलचे सीईओ टिम कुक भारतात ॲपलचे आणखी चार रिटेल स्टोअर सुरु करणार आहेत.यासह कंपनीचे AI पावर्ड सूट Apple Intelligence यावर्षी एप्रिलपासून भारतात येणार आहे. हे भारतातील AI संबंधीत Apple च्या नवीन लेटेस्ट डिव्हाईससाठी मोठं पाऊल आहे. कारण आतापर्यंत फक्त क्लिनअप सारखेच टूल मिळत होते.  

रिलायन्स जिओने १८९ रुपयांचा प्लॅन गुपचूप हटविला; सिम अॅक्टिव्हेट कसे ठेवणार? हाच तर स्वस्त होता...

ॲपलच्या  लेटेस्ट अर्निंग कॉल दरम्यान, रोलआउटमध्ये 'सिंगापूर आणि भारतासाठी स्थानिकीकृत इंग्रजी' यासह अनेक भाषांसाठी समावेश असेल असा कुक यांनी खुलासा केला. याचा अर्थ भारतातील आयफोन, आयपॅड आणि मॅक वापरकर्त्यांना लवकरच लेखन साधने, स्मार्ट उत्तरे आणि चॅटजीपीटी एकत्रीकरण यासारख्या एआय-टूल्स सारख्या टूल्सचा एक्सेस मिळेल.

टिम कुक यांनी ॲपलने भारतावर जास्त लक्ष दिल्याचे सांगितले. भारत ॲपलसाठी एक प्रमुख बाजारपेठ बनला आहे. डिसेंबर तिमाहीत कंपनीने देशात विक्रमी विक्री नोंदवल्याचे कुक यांनी सांगितले. आयफोन 'या तिमाहीत भारतात सर्वाधिक विक्री होणारे मॉडेल' होते. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा स्मार्टफोन मार्केट आहे आणि पीसी आणि टॅब्लेटसाठी तिसरा सर्वात मोठा देश आहे.

भारतीय बाजारपेठेत आपली पकड आणखी मजबूत करण्यासाठी, कंपनीने 'चार नवीन स्टोअर्स' उघडण्याची घोषणा केली आहे, हे भारतातील ॲपलच्या विद्यमान रिटेल स्टोअर्ससोबत जॉईन असतील.

टिम कुक यांचे भारतावर विशेष लक्ष

टिम कुक म्हणाले, "आमच्या अनेक उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये आमचे चांगले परिणाम झाले आहेत आणि मागील कॉलवरून तुम्हाला माहिती आहेच की, आम्ही विशेषतः भारताबद्दल उत्सुक आहोत." या तिमाहीत भारताने डिसेंबर-तिमाहीचा विक्रम केला आणि आम्ही तेथे अधिक स्टोअर्स उघडत आहोत. आम्ही तेथे चार नवीन स्टोअर उघडणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

या तिमाहीत भारतात आयफोन सर्वाधिक विक्री होणारे मॉडेल होते आणि ते जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे स्मार्टफोन मार्केट आहे. पीसी आणि टॅब्लेटसाठी तिसरे सर्वात मोठे मार्केट आहे म्हणूनच ही एक खूप मोठी बाजारपेठ आहे. बाजारपेठांमध्ये आमचा वाटा खूपच कमी आहे. 

Web Title: Apple to open four more new stores in India Tim Cook confirms, AI feature will also come

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.