अ‍ॅपलची Apple TV Plus आणि आर्केड गेम सर्व्हिस लाँच

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 09:16 AM2019-09-11T09:16:20+5:302019-09-11T09:30:15+5:30

युजर्ससाठी अ‍ॅपल टीव्ही प्लसची घोषणा करण्यात आली असून 1 नोव्हेंबरपासून याची सेवा सुरू करण्यात येणार आहे.

apple tv plus launch apple streaming service apple tv plus will launch on november know price plan and all benefits | अ‍ॅपलची Apple TV Plus आणि आर्केड गेम सर्व्हिस लाँच

अ‍ॅपलची Apple TV Plus आणि आर्केड गेम सर्व्हिस लाँच

Next
ठळक मुद्देअ‍ॅपल टीव्ही प्लसची घोषणा करण्यात आली असून 1 नोव्हेंबरपासून याची सेवा सुरू करण्यात येणार आहे. आयफोन, आयपॅड तसेच मॅक या उपकरणांमध्ये अ‍ॅपल टीव्हीचा पर्याय देण्यात आला आहे.अ‍ॅपल टीव्ही प्लससाठी प्रति महिना 4.99 डॉलर मोजावे लागणार आहेत.

कॅलिफोर्निया - अ‍ॅपल आयफोन 11 सीरिज लॉन्च करण्यात आली आहे. यामध्ये तीन फोन्सचा समावेश आहे. iPhone 11, iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max या महिन्याच्या अखेरीस भारतात विक्रीसाठी उपलब्ध होतील. अ‍ॅपल आपल्या iPhone 11 सीरिज सोबतच अ‍ॅपल टीव्ही प्लस आणि वॉचसारखे अनेक इलेक्ट्रीक प्रोडक्ट लाँच करत आहे. युजर्ससाठी अ‍ॅपल टीव्ही प्लसची घोषणा करण्यात आली असून 1 नोव्हेंबरपासून ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. आयफोन, आयपॅड तसेच मॅक या उपकरणांमध्ये अ‍ॅपल टीव्हीचा पर्याय देण्यात आला आहे.

अ‍ॅपल टीव्ही प्लससाठी प्रति महिना 4.99 डॉलर मोजावे लागणार आहेत. तसेच महिन्याच्या पॅकेजमध्ये फॅमेली पॅकचाही समावेश आहे. नव्या iPhone, iPad किंवा Apple TV ची खरेदी केली तर युजर्सना वर्षभर Apple TV Plus ची सेवा फ्री मिळणार आहे. यावर द मॉर्निंग शो, डिकिन्सन, सी, फॉर ऑल मॅनकाइंड, द एलिफंट क्वीन यांसारखे शो, चित्रपट व डॉक्युमेंटरी पाहता येणार आहेत.

आर्केड गेम सर्व्हिस 

अ‍ॅपल टीव्ही प्लससोबतच अ‍ॅपलने जगातील पहिली गेम्स सब्सक्रिप्शन सर्व्हिस अ‍ॅपल आर्केड देखील सुरू केली आहे. युजर्स मोबाईल आणि डेस्कटॉपवर याचा वापर करू शकतात. अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोरवर उपलब्ध असणाऱ्या 3 लाख गेम्सपेक्षा हे वेगळं आहे. यामध्ये युजर्सना 100 हून अधिक नवीन आणि एक्सक्ल्यूझिव्ह गेम्स मिळणार आहेत. अ‍ॅपलने आपल्या कार्यक्रमात तीन आर्केड गेम्सचा डेमो दाखवला. आर्केड गेम्समध्ये एका अंडर वॉटर गेमचा देखील समावेश आहे. 

अ‍ॅपलकडून तीन नवे फोन्स लॉन्च

आयफोन 11 सीरिजमधील फोन्सची किंमत 699 डॉलरपासून सुरु होणार आहे. या नव्या फोन्समध्ये A13 बायोनिक चिपसेट असेल. iPhone 11 ची भारतातील किंमत 64,900 रुपयांपासून सुरू होईल. यामध्ये 64 जीबी मेमरी असेल. याशिवाय हा फोन 128 जीबी आणि 256 जीबी वेरिएंटमध्येही उपलब्ध असेल. iPhone Pro भारतात 99,900 रुपयांपासून उपलब्ध होईल. तर iPhone 11 Pro Max ची किंमत 1,09,900 रुपयांपासून सुरू होईल. iPhone Pro आणि iPhone 11 Pro Max च्या या किमती 64 जीबी वेरिएंटच्या आहेत. याशिवाय हे दोन्ही फोन्स 256 जीबी आणि 512 जीबी मेमरी सुविधेसह उपलब्ध असतील. भारतात 27 सप्टेंबरपासून या फोन्सची विक्री सुरू होईल. iPhone 11 पाच रंगांमध्ये उपलब्ध असेल. या फोनमध्ये 6.1 इंचाची LCD IPS HD स्क्रीन असेल. कंपनीनं या फोनमध्ये A13 बायोनिक प्रोसेसर दिला आहे. 

अ‍ॅपल वॉच

नेक्स्ट जनरेशन अ‍ॅपल वॉचच्या 5 व्या सीरिजमध्ये कायम सुरू राहणारा नवीन डिस्प्ले देण्यात आला आहे. म्हणजेच युजर वेळ आणि नोटिफिकेशन सारखे पाहू शकणार आहे. हे वॉच 100 टक्के रिसायकल केलेल्या अ‍ॅल्यूमिनिअमपासून बनविण्यात आले आहे. या वॉचद्वारे ईसीजीही काढता येणार आहे. याशिवाय हार्ट रेट मॉनिटरही करता येणार आहे. वेळ दाखविण्यासोबत फोन कॉल, सॅटेलाईट कम्युनिकेशन्स, वॉयर रेझिस्टेंससारखे फिचर मिळणार आहेत. यामध्ये कंपनीने LTPO तंत्रज्ञानाचा आणि कमी वीज वापरणाऱ्या डिस्प्ले ड्रायव्हरचा वापर केला आहे. यामुळे या वॉचची बॅटरी 18 तास चालणार आहे. वॉचमध्ये होकायंत्रही देण्यात आले आहे. सुरक्षेसाठी SOS फीचर देण्यात आले आहे. आपत्कालीन काळात वॉचचे बटन दाबल्यानंतर कॉलही करता येणार आहे. यामध्ये सिरॅमिक व्हाईट, ब्लॅक बँड, आणि स्पोर्टस बँड मिळणार आहेत. सोबतच अ‍ॅपल पे, स्विम प्रूफ अशी सुविधाही मिळणार आहे. 
 

Web Title: apple tv plus launch apple streaming service apple tv plus will launch on november know price plan and all benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.