दवाखान्यात न जाताच Apple Watch नं दिली हृदय रोगाची माहिती; ‘हे’ फिचर आलं कामी

By सिद्धेश जाधव | Published: March 19, 2022 06:22 PM2022-03-19T18:22:24+5:302022-03-19T18:27:37+5:30

काही दिवसांपूर्वी हरियाणा मधील एका डेंटिस्टचा जीव Apple Watch मुळे वाचला. आता अ‍ॅप्पलचे सीईओ Tim Cook यांनी डेंटिस्टच्या पत्नीच्या ई-मेलला उत्तर दिलं आहे.  

Apple watch saves life of haryana dentist wife thanks ceo tim cook via email receives reply | दवाखान्यात न जाताच Apple Watch नं दिली हृदय रोगाची माहिती; ‘हे’ फिचर आलं कामी

दवाखान्यात न जाताच Apple Watch नं दिली हृदय रोगाची माहिती; ‘हे’ फिचर आलं कामी

googlenewsNext

Apple Watch मुळे जीव वाचल्याच्या बातम्या अनेकदा समोर आलेल्या आहेत. अशीच एक घटना भारतातील हरियाणामध्ये घडली होती. तिथे एका दातांच्या डॉक्टरचा जीव अ‍ॅप्पल वॉचच्या एका फिचरमुळे वाचला होता. त्यामुळे डेंटिस्टच्या पत्नीनं अ‍ॅप्पलचे सीईओ, Tim Cook यांना एक खास मेसेज पाठवला होता आणि आता त्या मेसेजला उत्तर आलं आहे.  

असा वाचला जीव  

हरियाणामधील डेंटिस्ट नितेश चोप्रा यांनी आपल्याला कमजोरी जाणवत असल्याचं आपल्या पत्नीला सांगितलं. त्यामुळे पत्नीनं आपल्या Apple Watch Series 6 वरून नीरज यांच्या हेल्थ रीडिंग्स घेण्यास सुरुवात केली. सुरुवातीला काही ECG रीडिंग्सकडे दुर्लक्ष करूनसुद्धा वॉचवर सतत त्याच रीडिंग्स येत होत्या. म्हणून त्यांनी डॉक्टरकडे जाण्याचा निर्णय घेतला. 12 मार्चला अ‍ॅप्पल वॉचनं घेतलेली रीडिंग आणि डॉक्टरांची रिडींग सारखीच होती. नंतर समजले कि नितेश चोप्रा यांची मुख्य हृदय धमनी पूर्णपणे ब्लॉक झाली होती. वेळेवर दवाखान्यात नसतं नेल्यास त्यांच्या जीवाला धोका होता.  

Tim Cook यांचं उत्तर 

नितेश यांचा जीव Apple Watch मुळे वाचला म्हणून त्यांच्या पत्नीनं अ‍ॅप्पलचे सीईओ, टिम कुक यांना ई-मेल करून त्यांचे आभार मानले होते. तसेच भविष्यसाठी शुभेच्छा दिल्या होत्या. या ई-मेलला आता टिम कुक यांनी उत्तर दिलं आहे. नितेश चोप्रा यांना योग्य वेळी उपचार मिळाले याचा आनंद त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच ही गोष्ट शेयर केल्याबद्दल आभार मानून त्यांनी चोप्रा दांपत्याला शुभेच्छा दिल्या आहेत.  

Web Title: Apple watch saves life of haryana dentist wife thanks ceo tim cook via email receives reply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.