Apple Watch Series 7 ची भारतीय किंमत आली समोर; 8 ऑक्टोबरपासून होणार खरेदीसाठी उपलब्ध
By सिद्धेश जाधव | Published: October 5, 2021 11:46 AM2021-10-05T11:46:34+5:302021-10-05T11:47:16+5:30
Apple Watch Series 7 Price In India: अॅप्पलने सांगितले आहे कि Apple Watch Series 7 भारतात 8 ऑक्टोबरला संध्यकाळी 5 वाजल्यापासून विक्रीसाठी येईल. परंतु ऑफलाईन स्टोर्समधून खरेदीसाठी 15 ऑक्टोबरची वाट बघावी लागेल.
अॅपल यावर्षी आपल्या आयफोन 13 सीरिजच्या लाँच इव्हेंटमधून Apple Watch Series 7 ची घोषणा केली होती. तेव्हा या स्मार्ट वॉचच्या अमेरिकन किंमतीचा खुलासा कंपनीने केला होता, परंतु भारतीय किंमत सांगण्यात आली नव्हती. आता कंपनीने आपल्या नव्या स्मार्टवॉचची भारतीय किंमत सांगितली आहे, तसेच हा डिवाइस देशात कधी खरेदीसाठी उपलब्ध होईल याची देखील घोषणा केली आहे.
Apple Watch Series 7 ची भारतीय किंमत
अॅप्पलने सांगितले आहे कि Apple Watch Series 7 भारतात 8 ऑक्टोबरला संध्यकाळी 5 वाजल्यापासून विक्रीसाठी येईल. परंतु ऑफलाईन स्टोर्समधून खरेदीसाठी 15 ऑक्टोबरची वाट बघावी लागेल. भारतात Apple Watch Series 7 ची किंमत 41,900 रुपयांपासून सुरु होईल. हा स्मार्ट वॉच 41mm आणि 45mm अशा दोन आकारात आणि मिडनाईट, स्टारलाईट, ग्रीन, ब्लु आणि रेड अशा पाच कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध होईल.
Apple Watch Series 7 चे फीचर्स
Apple Watch Series 7 मध्ये 18 तासांचा बॅटरी बॅकअप आणि 30% वेगवान चार्जिंग स्पीड दिला आहे. यात कंपनीने QuickPath सह एक फुल कीबोर्डला सपोर्टसह watchOS 8 दिला आहे. हा वॉच ECG आणि ब्लड ऑक्सीजन मॉनिटर अशा हेल्थ फीचर्ससह बाजारात आला आहे. तसेच व्यायाम करताना युजर पडल्यास यात फॉल आऊट डिटेक्शन देण्यात आले आहे. Apple Watch Series 7 आटपर्यांतचा सर्वात टिकाऊ वॉच असल्याचे कंपनीने सांगितले आहे. तसेच यात IP6X डस्ट रेजिस्टन्स देण्यात आले आहे. धुळीपासून रेटिंगसह आती आहे.