Apple Watch Series 7 आजपासून भारतात प्री-बुकिंगसाठी उपल्बध; दोन साईज व्हेरिएंटमध्ये घेता येणार विकत 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 06:17 PM2021-10-08T18:17:43+5:302021-10-08T18:17:54+5:30

Apple Watch Series 7 price in India: Apple Watch Series 7 आजपासून भारतात प्री-बुकिंगसाठी उपल्बध होणार आहे. या स्मार्टवॉचची किंमत 41,900 रुपयांपासून सुरु होत आहे.  

Apple watch series 7 will be available for pre booking in india from today  | Apple Watch Series 7 आजपासून भारतात प्री-बुकिंगसाठी उपल्बध; दोन साईज व्हेरिएंटमध्ये घेता येणार विकत 

Apple Watch Series 7 आजपासून भारतात प्री-बुकिंगसाठी उपल्बध; दोन साईज व्हेरिएंटमध्ये घेता येणार विकत 

googlenewsNext

Apple ची लेटेस्ट स्मार्टवॉच सीरिज Watch Series 7 आजपासून प्री-बुकिंगसाठी उपलब्ध झाली आहे. 8 ऑक्टोबर संध्याकाळी 5 वाजून 30 मिनिटांपासून हा स्मार्टवॉच प्री बुक करता येईल. कंपनीच्या अधिकृत वेबसाईट आणि ऑफलाइन स्टोरवर देखील ही सीरिज प्री-बुकसाठी उपलब्ध होईल. कंपनीने या वॉचचे दोन साईज व्हेरिएंट सादर केले आहेत. iPhone 13 सीरीजसह बाजारात आलेल्या या स्मार्टवॉचची किंमत 41,900 रुपयांपासून सुरु होते.  

Apple Watch Series 7 ची किंमत 

Apple Watch Series 7 च्या जीपीएस व्हेरिएंटच्या 41mm मॉडेलसाठी 41,900 रुपये आणि 45mm मॉडेलसाठी 44,900 रुपये मोजावे लागतील. तसेच सेल्युलर व्हेरिएंट 50,900 (41mm) आणि 53,900 (45mm) रुपयांमध्ये विकत घेता येतील. कंपनीने Apple Watch Series 7 चा स्टेनलेस केस मॉडेल देखील सादर केला आहे. ज्याच्या 41mm व्हेरिएंटची किंमत 69,900 रुपये आहे तर 45mm व्हेरिएंटसाठी 73,900 रुपये द्यावे लागतील.  

Apple Watch Series 7 चे फीचर्स  

Apple Watch Series 7 मध्ये 18 तासांचा बॅटरी बॅकअप आणि 30% वेगवान चार्जिंग स्पीड दिला आहे. यात कंपनीने QuickPath सह एक फुल कीबोर्डला सपोर्टसह watchOS 8 दिला आहे. हा वॉच ECG आणि ब्लड ऑक्सीजन मॉनिटर अशा हेल्थ फीचर्ससह बाजारात आला आहे. तसेच व्यायाम करताना युजर पडल्यास यात फॉल आऊट डिटेक्शन देण्यात आले आहे. Apple Watch Series 7 आटपर्यांतचा सर्वात टिकाऊ वॉच असल्याचे कंपनीने सांगितले आहे. तसेच यात IP6X डस्ट रेजिस्टन्स देण्यात आले आहे. धुळीपासून रेटिंगसह आती आहे.   

Web Title: Apple watch series 7 will be available for pre booking in india from today 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.