मोठ्या डिस्प्लेसह होणार Apple Watch Series 7 लाँच; या महिन्यात येऊ शकतो ग्राहकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2021 03:47 PM2021-09-04T15:47:53+5:302021-09-04T15:48:11+5:30

Apple Watch Series 7: Watch Series 7 कंपनी सप्टेंबरमध्ये आयोजित इव्हेंटमध्ये नवीन 2021 iPhone लाइनअपसह लाँच केली जाऊ शकते.  

Apple watch series 7 will have a bigger display and new  watch faces  | मोठ्या डिस्प्लेसह होणार Apple Watch Series 7 लाँच; या महिन्यात येऊ शकतो ग्राहकांच्या भेटीला

मोठ्या डिस्प्लेसह होणार Apple Watch Series 7 लाँच; या महिन्यात येऊ शकतो ग्राहकांच्या भेटीला

googlenewsNext

Apple Watch Series 7 लवकरच लाँच होणार आहे. आता Bloomberg ने माहिती दिली आहे कि, Apple Watch Series 7 ची स्क्रीन Series 6 च्या तुलनेत 16 टक्के मोठी असेल. तसेच मोठ्या डिस्प्लेसह यात नवीन वॉच फेस देखील मिळतील. हा स्मार्टवॉच 41mm आणि 45mm अश्या दोन स्क्रीन साईजमध्ये ग्राहकांच्या भेटीला येईल. अ‍ॅप्पलची Apple Watch Series 6 40mm आणि 44mm अश्या दोन आकारांत उपलब्ध झाली होती. Watch Series 7 कंपनी सप्टेंबरमध्ये आयोजित इव्हेंटमध्ये नवीन 2021 iPhone लाइनअपसह लाँच केली जाऊ शकते.  

Apple Watch Series 7 वॉच अ‍ॅप्पलच्या गेल्यावर्षी सादर झालेल्या Series 6 वॉचची जागा घेईल. या नवीन सीरिजमधील 45mm मॉडेलमध्ये 1.9-इंचाचा डिस्प्ले देण्यात येईल. तर 44mm मॉडेलमध्ये 1.78 इंचाचा डिस्प्ले मिळेल, अशी माहिती ब्लूमबर्गने दिली आहे. Apple Watch Series 7 मध्ये Modular Max, Continuum, आणि New World Time Face नावाचे नवीन वॉच फेस मिळतील.  

Apple आगामी Watch Series 7 च्या Nike आणि Hermes एडिशनसाठी स्पेशल वॉचफेस देखील तयार करत आहे. अपकमिंग Apple Watch Series 7 मध्ये अनेक सारे नवीन हेल्थ अपग्रेड आणि फास्ट प्रोसेसर देण्यात येईल. तसेच आगामी अ‍ॅप्पल वॉच फ्लॅट डिजाइनसह सादर केले जाईल. सध्या तांत्रिक कारणांमुळे अ‍ॅप्पल वॉचची निर्मिती थांबली असल्याचे रिपोर्ट्समधून समोर आले आहे. परंतु लवकरच प्रोडक्शन पुर्वव्रत होईल.  

Web Title: Apple watch series 7 will have a bigger display and new  watch faces 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Apple Incअॅपल