Apple नं लाँच केली पाण्याची बाटली, किंमत इतकी की मिळेल स्वस्त फ्रिज; पाहा काय आहे खास
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 07:27 PM2022-04-28T19:27:39+5:302022-04-28T19:33:53+5:30
Apple Water Bottle : अॅपलनं नुकतीच एक पाण्याची बाटली लाँच केली आहे. अन्य प्रोडक्टप्रमाणे ही बॉटलदेखील प्रीमिअम प्राईज टॅगसोबत उपलब्ध आहे.
Apple Water Bottle : दिग्गज टेक कंपनी अॅपल आपल्या प्रीमिअम प्रोडक्ट्ससाठी ओळखली जाते. त्यांची किंमत अन्य कंपन्यांच्या तुलनेत खुप अधिक असते. नुकताच कंपनीनं एक पॉलिशिंग क्लोथ लाँच केला होता. त्याची किंमत १९०० रुपये इतकी आहे. आता कंपनीनं एक वॉटर बॉटल लाँच केली आहे. त्याची किंमत तुमच्या चेहऱ्याचा रंग उडवू शकते. सध्या ही कंपनी अमेरिकेत लाँच करण्यात आली असून त्याचं नाव Hidrate Spark असं आहे.
कंपनीनं आपल्या अधिकृत वेबसाईटवर ही वॉटर बॉटल लिस्ट केली आहे. याची किंमत पाहून तुमच्या चेहऱ्याचा रंग नक्कीच उडेल. याची किंमत ५९.९५ डॉलर्स म्हणजेच जवळपास ४६०० रुपये इतकी आहे. सध्या ही केवळ अमेरिकन बाजारपेठेत उपलब्ध आहे. यात काय विशेष आहे याबद्दल तुम्ही विचार करत असाल. ही बॉटल अॅपलच्या अन्य प्रोडक्टप्रमाणेच खास आहे.
ही एक स्मार्ट वॉटर बॉटल आहे आणि ती तुमच्या डेली वॉटर अथवा फ्युएड इनटेकला मॉनिटर करते. ही बॉटलदेखील दोन व्हेरिअंट्समध्ये उपलब्ध आहे. ही Hidrate Spark आणि Hidrate Spark Pro या व्हेरिअंटमध्ये मिळते. याची किंमत अनुक्रमे ५९.९५ डॉलर्स आणि ७९.९५ डॉलर्स म्हणजेच जवळपास ६१०० रुपये आहे. भारतात या किंमतीत तुम्हाला एक छोटो फ्रिजही मिळू शकतो.
काय आहेत फीचर्स?
Hidrate Spark ही एक स्टील बॉटल आहे. तसंच ती सिल्व्हर आणि ब्लॅक या दोन कलर व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. यात एक एलईडी सेन्सर असून तो वॉटर इनटेक सेन्स करतो. तसंच अॅपल हेल्थ अॅपला तो ब्लूटूथ द्वारे अलर्टही करतो. Hidrate Spark Pro ही ब्लॅक आणि ग्रीन कलर व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. ही एक व्हॅक्युम आयसोलेटेड बॉटल असल्यानं त्यात २४ तास पाणी थंड राहू शकतं. याचं वजन जवळपास ९१० ग्राम आहे. अन्य देशांमध्ये ही बॉटल केव्हा उपलब्ध होईल याबाबत मात्र माहिती देण्यात आलेली नाही.