अॅपल iPhone 14 नंतर आता iPad Pro 2022 लाँच करणार, जाणून घ्या कधी येणार बाजारात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2022 07:48 PM2022-10-17T19:48:50+5:302022-10-17T19:49:32+5:30
Apple पुन्हा एक नवे मॉडेल बाजारात आणणार आहे. येत्या काही दिवसांत आपला नवीन टॅबलेट iPad Pro 2022 लाँच करणार आहे.
जगातील सर्वात लोकप्रिय असणारी स्मार्टफोन कंपनी अॅपलने सप्टेंबर 2022 मध्ये नवी स्मार्टफोन iPhone 14 सेरीज लाँच केली. आता Apple पुन्हा एक नवे मॉडेल बाजारात आणणार आहे. येत्या काही दिवसांत आपला नवीन टॅबलेट iPad Pro 2022 लाँच करणार आहे. यात नवीन M2 चिप असणार आहे. या टॅब्लेटच्या लाँचची तारीख किंमत आणि फिचर बद्दल जाणून घेऊया.
याबद्दल कंपनीने अजुनही कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. iPad Pro 2022 चे नवीन 11-इंच आणि 12.9-इंच डिस्प्ले व्हेरिएंट या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर 2022 च्या अखेरीस लॉन्च केले जाऊ शकते असा अंदाज आहे.
अधिकृतपणे iPad Pro 2022 ची लाँच तारीख समोर आलेली नाही. Apple हा टॅबलेट 27 ऑक्टोबर 2022 पूर्वी लाँच होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.एका अहवालानुसार, हा टॅबलेट डिझाईनच्या बाबतीत त्याच्या जुन्या मॉडेलसारखाच असेल, म्हणजेच याला समान फ्लॅट-एज डिझाइन देखील दिले जाईल.
इंस्टाग्रामने भारतीय युजर्ससाठी आणली दिवाळी ऑफर, अशाप्रकारे Reels बनवून लाखो रुपये कमवा
मार्क गर्मन यांच्या अहवालानुसार, iPad Pro 2022 मध्ये मागील मॉडेल्सचे बेझल नसतील आणि USB Type-C पोर्ट ऐवजी लाइटनिंग पोर्ट दिले जाईल. अॅपल अजूनही पोर्टलेस आयफोन आणि आयपॅडवर काम करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. येत्या काही महिन्यांत Apple MacBook Pro देखील लाँच करू शकते.