हाय रे दैवा! फोन अॅपलचा पण डिस्प्ले सॅमसंगचा; Iphone 12 वर काय ही वेळ आली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 04:46 PM2020-05-20T16:46:12+5:302020-05-20T16:57:21+5:30
iPhone 12 सिरीजमध्ये चार मॉडेल लाँच केले जाणार आहेत. आयफोन १२, आयफोन १२ मॅक्स, आयफोन १२ प्रो आणि आयफोन १२ प्रो मॅक्स असे हे फोन असणार आहेत.
एकेकाळी पेटंटवरून सॅमसंगवर अब्जावधी डॉलरचा खटला दाखल करणाऱ्या जगप्रसिद्ध कंपनी अॅपलवर खरेतर नामुष्कीची वेळ आली आहे. अॅपल लवकरच आयफोनची १२ वी सिरीज लाँच करणार आहे. धक्कादायक बाब म्हणजे अॅपल या फोनमध्ये चक्क सॅमसंगचा डिस्प्ले वापरणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
डिस्प्ले सप्लाय चेन कंसल्टंट (DSCC) ने त्यांच्या अहवालात सांगितले की, iPhone 12 सिरीजमध्ये चार मॉडेल लाँच केले जाणार आहेत. आयफोन १२, आयफोन १२ मॅक्स, आयफोन १२ प्रो आणि आयफोन १२ प्रो मॅक्स असे हे फोन असणार आहेत. हे फोन यंदाच्या दुसऱ्या सहामाहीमध्ये लाँच केले जातील. या अहवालानुसार यापैकी तीन फोनमध्ये सॅमसंगचा डिस्प्ले वापरला जाणार आहे. आयफोन १२ मध्ये 5.4 इंचाची स्क्रीन दिली जाणार आहे. हा डिस्प्ले सॅमसंगचा ओएलईडी डिस्प्ले असणार आहे. या डिस्प्लेचे रिझोल्यूशन 2340 x 1080 पिक्सल असणार आहे.
आयफोन १२ प्रोमध्ये ६.१ इंचाचा सॅमसंगचाच OLED डिस्प्ले असणार आहे. याचे रिझॉल्यूशन 2532 x 1170 पिक्सल असेल. तर याच सिरीजच्या आयफोन १२ प्रो मॅक्समध्ये 6.68 इंचाचा सॅमसंगचा फ्लेक्सिबल OLED पॅनेल असण्याची शक्यता आहे. याचे रिझोल्युशन 2778 x 1284 पिक्सल असेल.
किंंमत किती?
आयफोन १२ मध्ये ४४०० एमएएचची बॅटरी देण्यात येण्याची शक्यता आहे. ही बॅटरी अॅपलची आतापर्यंतची सर्वात जास्त क्षमतेची बॅटरी असेल. तर आयफोन १२ चा बेस व्हेरिअंट आयफोन ११ पेक्षाही स्वस्त असण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या रिपोर्टमध्ये आयफोन १२ सीरीजची किंमत ६०० ते ७०० डॉलर असू शकते.
अन्य महत्वाच्या बातम्या...
चीनची १९४९ पासून जखम भळभळती; नौदलाचा अजस्त्र विकास केवळ तैवानमुळेच
निलेश राणेंवर तृतीयपंथी भडकले; 'हिजडा' शब्दावरून दिला इशारा
टोयोटा कल्ला करणार; हॅरिअरसारखी खतरनाक SUV Venza आणणार
कोरोना संकटात पीएफ काढताय? रिजेक्ट न होण्यासाठी या पाच चुका टाळा