Apple WWDC 2022: दोन जबराट लॅपटॉप लाँच; असे आहेत MacBook Air 2022 आणि MacBook Pro चे फीचर्स
By सिद्धेश जाधव | Published: June 7, 2022 08:45 AM2022-06-07T08:45:40+5:302022-06-07T08:45:56+5:30
Apple नं काल रात्री झालेल्या Apple WWDC 2022 इव्हेंटमधून MacBook Air 2022 आणि नवीन MacBook Pro लाँच केले आहेत.
अॅप्पलनं आपल्या Apple WWDC 2022 इव्हेंटमध्ये अनेक प्रोडक्ट्सची घोषणा केली आहे. यात iOS 16, M2 प्रोसेसर, iPadOS 16, WatchOS 9 आणि macOS Ventura सह कंपनीनं MacBook Air 2022 आणि MacBook Pro लॅपटॉप देखील लाँच केले आहेत. दोन्ही मॅक बुक शानदार डिजाईन आणि खास फीचर्ससह बाजारात आले आहेत. दोन्ही लॅपटॉप्समध्ये M2 processor देण्यात आला आहे.
Apple MacBook Air
नवीन Apple MacBook Air मध्ये कंपनीनं MagSafe चार्जिंगची सुविधा दिली आहे. याच्या डिस्प्लेमध्ये एक नॉच देण्यात आला आहे. या मॅक बुकचा डिस्प्ले 13.6 इंचाचा आहे, जो liquid retina सह येतो. याचा डिस्प्ले एक बिलियन कलर्सला सपोर्ट करतो, ज्याचा अर्थ असा आहे की हा 10-बिट डिस्प्ले आहे. नवीन मॅक बुक एयर 2022 मध्ये 1080p रिजोल्यूशन असलेला वेबकॅम देण्यात आला आहे.
स्पिकर आणि माईक डिस्प्ले आणि कीबोर्डच्या मधल्या भागात देण्यात आले आहेत. यात चार स्पिकर असलेली साउंड सिस्टम देण्यात आली आहे, जी Spatial audio ला सपोर्ट करते. सुरक्षेसाठी Touch ID चा पर्याय देण्यात आला आहे.
Apple MacBook Air साइलेंट फॅनलेस डिजाइनसह बाजारात येईल. नवीन मॅक बुक 18 तासांपर्यंत व्हिडीओ प्लेबॅक आणि संपूर्ण दिवसांच्या बॅटरी लाईफसह येतो. युजर्स आता एक साथ दोन डिवाइस चार्ज करू शकतात. Apple मॅक बुक एयरमध्ये 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट देखील देण्यात आला आहे. यात एक हेडफोन जॅक मिळतो.
MacBook Pro
अॅप्पल मॅक बुक एयर 2022 प्रमाणे नवीन मॅक बुक प्रो देखील M2 प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे. हा नवीन चिपसेट देखील काल झालेल्या इव्हेंटमधून ग्राहकांच्या भेटीला आला आहे. MacBook Pro लॅपटॉपमध्ये कंपनीनं 13 इंचाच्या डिस्प्लेसह शानदार स्पेसिफिकेशन्स आणि दमदार फीचर्स मिळतात.
किंमत आणि उपलब्धता
M2 प्रोसेसर असलेल्या Apple MacBook Air ची किंमत 1099 डॉलर म्हणजे सुमारे 85,509 रुपयांपासून सुरु होते. तर M2 प्रोसेसरसह येणाऱ्या MacBook Pro ची किंमत म्हणजे सुमारे 1,01,067 रुपयांपासून सुरु होते. अचूक तारीख जरी समोर आली नसली तरी पुढील महिन्यात यांची विक्री होईल, असं कंपनीनं सांगितलं आहे.