Apple च्या iPhone 13 मध्ये असणार डीएसएलआर कॅमेराचे फिचर; मोठ्या कंपनीला मिळाले कंत्राट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 09:07 AM2021-01-28T09:07:42+5:302021-01-28T09:08:01+5:30

iPhone 13 series : आयफोन १३ साठी एक खास कॅमेरा तयार करण्याची जबाबदारी दिली आहे. यामध्ये Sensor-Shift optical image stabilisation सारखे खतरनाक फिचर देण्यात येणार आहे.

Apple's iPhone 13 will feature a DSLR camera;big company got the contract | Apple च्या iPhone 13 मध्ये असणार डीएसएलआर कॅमेराचे फिचर; मोठ्या कंपनीला मिळाले कंत्राट

Apple च्या iPhone 13 मध्ये असणार डीएसएलआर कॅमेराचे फिचर; मोठ्या कंपनीला मिळाले कंत्राट

googlenewsNext

जगातील सर्वात प्रसिद्ध टेक कंपन्यांमधील एक Apple यंदा iPhone 13 Series चे स्मार्टफोन लाँच करणार आहे. कोरोना काळातही आयफोन १२ ला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे कंपनीने नवीन सिरीज लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे या नव्या आयफोन १३ च्या चर्चा झडू लागल्या आहेत. 


आयफोन १३ च्या सिरीजमध्ये यावेळी मोठे बदल दिसू शकतात. महत्वाचा बदल म्हणजे आयफोनचा कॅमेरा डीएसएलआर कॅमेऱ्या सारखा असण्याची शक्यता आहे. याद्वारे मोबाईलद्वारेच चांगली फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीची मजा ग्राहक घेऊ शकणार आहेत. सध्या iPhone 12 सिरीजचे स्मार्टफोन जगभरात विक्रीचे नवनवीन रेकॉर्ड प्रस्थापित करत आहेत. 


iPhone 13 series साठी अॅपलने Cupertino च्या एका टेक एक्सपर्टसोबत हातमिळवणी केली आहे. त्याला आयफोन १३ साठी एक खास कॅमेरा तयार करण्याची जबाबदारी दिली आहे. यामध्ये Sensor-Shift optical image stabilisation सारखे खतरनाक फिचर देण्यात येणार आहे. असे फिचर फक्त iPhone 12 Pro Max मध्ये पहायला मिळाले आहे. अन्य कोणत्याही कंपनीने हे फिचर अद्याप दिलेले नाही. Huawei नजीकच्या काळात काही स्मार्टफोन अॅडव्हान्स फिचर कॅमेराचे लाँच करत आहे. DigiTimesमध्ये आयफोन १३ च्या कॅमेराचे काही माहिती लीक झाली आहे. 


टेक अॅनालिस्ट Ming-Chi Kuo यांनी सांगितले की, यंदा आयफोनचे चार व्हेरिअंट लाँच होणार आहेत. यामध्ये iPhone 13 Mini, iPhone 13, iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max सारखे स्मार्टफोन्स लॉन्च होतील. या फोनचे डिझाईन आणि स्पेसिफिकेशन्समध्ये मोठे बदल पहायला मिळतील. 

Web Title: Apple's iPhone 13 will feature a DSLR camera;big company got the contract

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Apple Incअॅपल