iPhone 14 सिरीजच्या विक्रीआधीच अॅपलची वेबसाईट हँग झाली; ग्राहक वैतागले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 11:34 AM2022-09-15T11:34:05+5:302022-09-15T11:34:24+5:30
अॅपल कंपनीची वेबसाईट क्रॅश झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
दिग्गज टेक कंपनी अॅपलची वेबसाईट हँग झाल्याचा अनुभव जगभरातील युजर्सना येत आहे. भारतासह अनेक देशांमध्ये अॅपलची वेबसाईट ओपन करण्यास समस्या येत आहे. वेबसाईट ओपन होताना खूप वेळ लागत आहे, परंतू सर्व कंटेंट लोड होत नाहीय.
अनेकांना 403 forbidden errors हा एरर दिसत आहे. कंपनीने नुकतेच आयफोन १४ सिरीज, अॅपल वॉच सिरीज ८ आणि AirPods Pro 2 सह अनेक उत्पादने लाँच केली होती. आयफोनची लेटेस्ट रेंज उद्यापासून म्हणजेच १६ सप्टेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. त्यापूर्वीच कंपनीची वेबसाईट क्रॅश झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अॅपलने अद्याप यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
काही वेळापूर्वी अॅपल स्टोअरचा सर्व्हरही काही भागात डाऊन झाला होता. आयफोन 14 मालिकेची प्री-ऑर्डर सुरू होताच ही समस्या उद्भवली होती. त्यावेळी ग्राहक चेकआउट किंवा ट्रेड-इन प्रक्रिया पूर्ण करू शकले नाहीत. डाउन डिटेक्टरच्या मते, जगभरातील अनेक भागातील लोकांना Apple वेबसाइटवर जाण्यास समस्या येत आहेत. ही समस्या ऍपल वेबसाइटच्या सर्व पेजेसवर येत नसून निवडक पेजेसवरच येत आहे.
iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max हे आयफोन उद्यापासून विक्रीला उपलब्ध होणार आहेत. जर तुम्ही आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही जुन्या मॉडेल्सचा विचार करू शकता. आयफोन 13 सिरीज आणि इतर मॉडेल्सवर ऑफर मिळत आहेत. फ्लिपकार्टवरील सेलमध्ये, तुम्ही आयफोन १३ हँडसेट आतापर्यंतच्या सर्वात कमी किमतीत खरेदी करू शकणार आहात. हा फोन 50 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत हा फोन डिस्काउंटसह उपलब्ध होण्याची शक्यता आहे.