अलर्ट! फोनवर 'हे' संकेत दिसले तर समजा लपलाय व्हायरस; Google सांगितली सेफ राहण्याची पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 11:56 AM2023-12-06T11:56:30+5:302023-12-06T12:05:29+5:30

फोनमध्ये मालवेअर किंवा व्हायरस आला आहे हे कसं ओळखायचं हे आधी जाणून घेऊया...

apps how to know if my phone is tapped or hacked these signs in android mobile means hacker attack | अलर्ट! फोनवर 'हे' संकेत दिसले तर समजा लपलाय व्हायरस; Google सांगितली सेफ राहण्याची पद्धत

अलर्ट! फोनवर 'हे' संकेत दिसले तर समजा लपलाय व्हायरस; Google सांगितली सेफ राहण्याची पद्धत

आयुष्य डिजिटल होत असताना हॅकिंगचा धोकाही झपाट्याने वाढत आहे. आजकाल हॅकर्स हॅकिंगच्या अशा अत्याधुनिक पद्धतींचा अवलंब करत आहेत की लोकांना आपण जाळ्यात अडकलोय हे समजतही नाही. अनेकदा हॅकर्सचा उद्देश बँकिंग माहिती चोरणे हा असतो. पण चांगली गोष्ट अशी आहे की Google ने Android वर मालवेअरला सामोरे जाण्याचा आणि काढून टाकण्याचा मार्ग सांगितला आहेत. फोनमध्ये मालवेअर किंवा व्हायरस आला आहे हे कसं ओळखायचं हे आधी जाणून घेऊया...

फोन हॅक झाला आहे हे कसे कळेल?

1 - गुगलने तुमचं अकाऊंट साइन आउट केलं, तर तुमचा फोन हॅकरच्या हाती लागल्याचा हा सर्वात मोठा संकेत आहे. साइन आउट का केलं आहे ते चेक करा.

2 - तुम्ही फोनवर काही पॉप-अप आणि जाहिराती पाहिल्या असल्या असतील पण ज्या खरं तर त्या जागी नसायला हव्या होत्या. तर फोन हॅक होण्याची शक्यता आहे.

3 - तुमचा फोन खूप स्लो चालत आहे असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही यासाठी कोणत्या प्रकारची अॅक्टिव्हिटी कारणीभूत आहे ते तपासावे.

4 - अचानक स्टोरेज कमी होतं असं वाटत असेल तर चेक करा. अनेकदा हॅकर्स आपल्या परवानगी शिवाय फोनमध्ये काही गोष्टी डाऊनलोड करतात. 

5- जर तुमचा ब्राउझर वेगवेगळ्या वेबसाइट्स किंवा एडल्ट कंटेंटवर रीडायरेक्ट होऊ लागला, तर समजून घ्या की तुमच्या फोनसोबत गडबड केली जात आहे.

6 - तुम्ही कधीही पाठवलेले नसलेले मेसेज तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना मिळाले तर नक्कीच तुमच्या फोनवर कोणीतरी प्रवेश करत आहे.

कसा करायचा बचाव? 

Google सल्ला देतं की तुम्ही Play Protect सुरू केले असल्याची खात्री करा. हे प्ले स्टोअरमध्ये करता येतं. यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरवर जावे लागेल, त्यानंतर प्रोफाइल आयकॉनवर टॅप करा आणि नंतर प्ले प्रोटेक्टवर टॅप करा. यानंतर तुम्हाला सेटिंग्जवर क्लिक करावे लागेल आणि Play Protect सह स्कॅम एप्स चालू करावे लागतील.

Google चे म्हणणे आहे की डिव्हाइस सॉफ्टवेअर हे लेटेस्ट व्हर्जन अपडेट ठेवा. Google Play व्यतिरिक्त बाहेरून एप्स इंस्टॉल करणे टाळा. याशिवाय, इंटरनेटवर आढळणारे APK देखील इन्स्टॉल करू नयेत. जर कोणत्याही वेबसाइटवर पेड एप्स मोफत उपलब्ध असतील तर तुम्ही ते इन्स्टॉल करणं टाळावं.

Google तुम्हाला धोके ओळखण्यासाठी सुरक्षा तपासणी करण्याची परवानगी देतं. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, तुम्ही तुमच्या कोणत्याही सुरक्षा समस्यांचे निराकरण करण्यासाठी /myaccount.google.com/security-checkup?pli=1 ला भेट देऊ शकता.
 

Web Title: apps how to know if my phone is tapped or hacked these signs in android mobile means hacker attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.