फोनचा लॉक पॅटर्न, पिन विसरला...चिंता नको...असा करा अनलॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 03:57 PM2018-09-26T15:57:08+5:302018-09-26T15:57:45+5:30

बऱ्याचदा मजबूत पासवर्ड देण्याच्या नादात कठीण पासवर्ड टाकला जातो आणि नंतर विसरायला होतो

are you forgot phone's lock pattern, the PIN ... do not worry ... do this trick | फोनचा लॉक पॅटर्न, पिन विसरला...चिंता नको...असा करा अनलॉक

फोनचा लॉक पॅटर्न, पिन विसरला...चिंता नको...असा करा अनलॉक

googlenewsNext

नवी दिल्ली : जर मोबाईलचा पासवर्ड, पिन किंवा पॅटर्न लॉकने सुरक्षित केला असेल आणि विसरायला झाल्यास मोबाईल उघडणे कठीण बनते. बऱ्याचदा मजबूत पासवर्ड देण्याच्या नादात कठीण पासवर्ड टाकला जातो आणि नंतर विसरायला होतो. अशी वेळ आल्यानंतर घाबरून जायची काहीही गरज नाही. खाली दिलेल्या स्टेप फॉलो केल्यास तुमचा अनलॉक झालेला फोन एका झटक्यात उघडू शकणार आहे. 

  • स्टेप 1 : स्मार्टफोन किंवा कॉम्प्युटरवरील ब्राऊजरवर  https://myaccount.google.com/find-your-phone-guide या लिंकवर जावे लागणार आहे. 
  • स्टेप 2 : यानंतर मोबाईलमध्ये असलेल्या गुगल खात्याच्या मेल आयडीद्वारे लॉगईन करावे लागणार आहे.  
  • स्टेप 3 : लॉग इन झाल्यानंतर त्या मेल आयडीशी जोडलेले मोबाईलची यादी दिसेल. यातून तुम्हाला जो फोन अनलॉक करायचा असेल तो निवडावा लागेल.
  • स्टेप 4 : यानंतर दुसऱ्या स्क्रीनवर Lock your phone पर्याय दिसेल. यावर क्लिक करावे. 
  • स्टेप 5 : यानंतर जुन्या विसरलेल्या पासवर्ड, पिन किंवा पॅटर्नच्या बदल्यात नवा पासवर्ड सेट करावा. 
  • स्टेप 6 : पासवर्ड सेट झाल्यानंतर खाली दिलेल्या लॉक बटनावर क्लिक करावे. 
  • स्टेप 7 : यानंतर नवीन पासवर्ड टाकावा. यानंतर स्मार्टफोन अनलॉक होईल.


Ok Google चीही मदत
 जर तुम्ही गुगल असिस्टंटचा योग्य प्रकारे सेटअप केला असेल तर त्यावेळी Unlock with voice फिचर पाहिले असेल. हे फिचर तुमच्या जुन्या नोंद केलेल्या आवाजाच्या आधारे काम करते. हे फिचर जर चालू असेल तर स्मार्टफोन अनलॉक करण्यासाठी केवळ Ok Google म्हणावे लागेल.

Web Title: are you forgot phone's lock pattern, the PIN ... do not worry ... do this trick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.